शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

PHOTO : गगनबावड्याच्या घाटात दडलाय बकासुराचा अनोखा प्राचीन वाडा; ऐनारी गावाजवळ पांडवकालीन गुहा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 1:49 PM

ही गुहा सह्याद्री पर्वतरांगांमध्ये झाकून गेली होती. ग्रामस्थांनी श्रमदानाने गुहेचे तोंड खुले केले. या गुहेपासून ४ किलोमीटरवर वेसरफ (ता. गगनबावडा) ची हद्द सुरू होते. गगनगड येथून ६ किलोमीटर अंतरावर आहे.

आदित्य वेल्हाळ -

कोल्हापूर: कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर व समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर असलेली ऐनारी गुहा ही बकासुराचा वाडा म्हणून प्रचलित आहे. ऐनारी गावाच्या नावावरून या गुहेला ऐनारी नाव पडले असले तरी हाच तो बकासुराचा प्रदेश जेथे भीमाने बकासुराला मारले, असे दंतकथांमध्ये सांगितले जाते. या गुहेच्या पायथ्याशी राकसवाडा आहे. ही गुहा सह्याद्री पर्वतरांगांमध्ये झाकून गेली होती. ग्रामस्थांनी श्रमदानाने गुहेचे तोंड खुले केले. या गुहेपासून ४ किलोमीटरवर वेसरफ (ता. गगनबावडा) ची हद्द सुरू होते. गगनगड येथून ६ किलोमीटर अंतरावर आहे. सध्या या गुफांमधून प्राणी, वटवाघळांचा मुक्तसंचार आहे. या अपरिचित बकासुराच्या वाड्याची साहस मोहीम कोल्हापुरातील वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन रिसर्च सेंटरचे देवेंद्र भोसले व ऍडव्हेंचर गिअरचे गिर्यारोहक विनायक कालेकर यांनी रविवारी आयोजित केली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भुईबावडापासून जवळ ही गुहा आहे. बकासुराची स्मृती म्हणून दरवर्षी येथील शेतकरी प्रतीकात्मक बैल करून छोटीशी बैलगाडी जुंपतात त्यावर भाताच्या गोण्या व शिजविलेला भात ठेवतात व भात राकसवाडा जंगल परिसरात व गुहेच्या परिसरात ठेवला जातो. काही वर्षांपूर्वी भुईबावडा येथील शिक्षक पी. एन. बगाडे आपल्या सहकाऱ्यांसोबत या परिसरात भटकंती करत गेले होते. त्यांच्या समोर एक साळींदर या गुहेत शिरला. बगाडे व सहकारी त्याच्यामागून आत शिरले तर तिथे त्यांना हा वाडा दिसला. त्यावेळी या वाड्याची मोठी चर्चा झाली, अनेकांची उत्सुकता वाढली. तेव्हापासून ऐनारीची ही गुहा प्रसिद्धीला आली. अनेक इतिहास संशोधकांनी याची पाहणी केली. त्यांच्या मते ही गुहा सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीची असावी, असा कयास आहे. 

अशी आहे गुहा या गुहेचे अंतगृह वैशिष्ट्यपूर्ण आहे. आत शयनगृह, पाण्याचे कुंड आहे. १२ खांबांचे सभागृह आहे. यातील सहा खांबांची पडझड झाली आहे. प्रत्येक खांब १२ ते १४ फूट उंचीचा व दाेन खांबांत १० फुटांचे अंतर आहे. गुहेपासून २० फुटांवर विहीर आहे, जी आता मुजली आहे. 

रोपच्या साह्याने दरीतून जातो मार्ग - वेसरफ (ता. गगनबावडा) मार्गे चालत अनुभवी गिर्यारोहक व ट्रेकर्सच्या माध्यमातून रोपच्या साह्याने दरीतून जावे लागते. - मुंबई-गोवा महामार्गावरून भुईबावडा घाटातून ४ किलोमीटरवर ऐनारी गाव आहे. या गावातून ऐनारी गुहेकडे १५०० मीटर उंचीवरील पायवाट बिकट आहे. पण गावकऱ्यांच्या मदतीने येथे जाता येते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhistoryइतिहास