शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
2
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
3
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
4
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
5
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
6
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
7
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
8
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
9
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
10
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
11
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
12
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
13
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
14
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
15
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
16
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
17
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
18
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
19
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
20
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे; हटके मागण्या करत काढली अनोखी रॅली 

By संदीप आडनाईक | Published: February 07, 2024 12:51 PM

कोल्हापूर : ‘लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे’, ‘कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे’, ‘पेट्रोल फुकट मिळालेच पाहिजे’, ‘हवेवर गाड्या चालल्याच पाहिजेत’ अशा ...

कोल्हापूर : ‘लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे’, ‘कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे’, ‘पेट्रोल फुकट मिळालेच पाहिजे’, ‘हवेवर गाड्या चालल्याच पाहिजेत’ अशा हटके मागण्या कोणी केल्या असतील तर त्या कोल्हापूरकरांनीच. कोल्हापूरकर प्रबोधनासाठी आणि आंदोलनासाठी अशा युक्त्या केव्हा वापरतील याचा नेम नाही.आता साधा ‘सायकल चालवा, प्रदूषण टाळा’ असा सरळधोपट प्रचार करण्याऐवजी अनेक गमतीदार फलक लावून खासबाग मैदानापासून चिखली, प्रयाग तीर्थक्षेत्रापर्यंत निघालेल्या या अनोख्या सायकल रॅलीमध्ये हौशी लहान मुलांपासून ज्येष्ठांचा सहभाग होता. या रॅलीची चर्चा केवळ कोल्हापूरकरांमध्येच नव्हती, तर सोशल मीडियावरच्या युजर्सनीही या व्हिडीओंना चांगलाच प्रतिसाद दिला.वधूच्या पोशाखातील माधुरी दीक्षितची आरती ओवाळून या आगळ्या-वेगळ्या सायकल रॅलीला सोमवारी खासबाग मैदानाजवळून प्रारंभ झाला. पिपाण्या वाजवीत, ढोल बडवत, बंबात लाकूड गुळगुळीत, आबा घुमीव, ह्योच नवरा पाहिजे, एकच मासा, गाडगाभर रस्सा अशा फलक लावलेल्या सायकली घेऊन दुपारी १२ वाजता मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, कुंभार गल्ली, तोरस्कर चौक, आंबेवाडी, चिखली, प्रयाग तीर्थक्षेत्र आणि परत खासबाग मैदान या मार्गावर ही रॅली निघाली. नेहमी नागरी प्रश्नांचे विषय गमतीदार पद्धतीने मांडून लोकप्रबोधन करणाऱ्या पुरस्कृत पॉवरफुल्ल चिक्कू मंडळाने ही रॅली काढली. चिक्कूनगरचा मोठा नामफलक लावलेली रिक्षा अग्रभागी होती. सायकल वापरावी, प्रदूषण टाळावे, आरोग्य चांगले राहावे यासाठीचा संदेश अनोख्या पद्धतीने देणाऱ्या या उपक्रमाचे आयोजन अशोक पवार, सचिन साबळे, जयदेव बोरपाळकर, राजेश गायकवाड, विश्वनाथ पोवार, श्रीधर जाधव, रामभाऊ जगताप, अभिजित पोवार यांनी केले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocial Mediaसोशल मीडिया