शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

Accident News kolhapur: दुचाकीच्या धडकेत नवे पारगावची वृद्ध महिला जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 6:55 PM

नवे पारगाव : वाठार - बोरपाडळे राज्य मार्गावर नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी स्कुल जवळ मोटरसायकल ...

नवे पारगाव : वाठार - बोरपाडळे राज्य मार्गावर नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी स्कुल जवळ मोटरसायकल स्वाराने जोरदार धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. पार्वती तुकाराम हुजरे (वय ७०, रा.नवे पारगाव) असे या मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. आज, सोमवारी सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, पार्वती हुजरे या नेहमी प्रमाणे सकाळच्या सुमारास तात्यासाहेब कोरे मिलिटरी स्कुलच्या प्रांगणात महादेव मंदिरात दर्शनासाठी पायी जात होत्या. येथील समर्थ टायर्सच्या समोर वाठारहुन वारणानगरच्या दिशेने मोटरसायकल (एम.एच.१२. के.वाय. ९५७६) भरधाव जात होती. मोटरसायकलवर चालक ओंकार प्रकाश बिरनाळे (वय१८), प्रकाश बापु बिरणाळे व निलेश अशोक ऐवाळे ( रा. चौगुले स्टॉप आळते. ता. हातकणंगले) होते. भरधाव मोटरसायकलची पायी चालत असणाऱ्या पार्वती हुजरे यांना पाठीमागुन जोरदार धडक दिली. त्या रस्त्यावर जोरात आपटल्याने डोक्यास गंभीर इजा झाली. अतिरक्तस्त्रावा मुळे त्या जागीच ठार झाल्या.नवे पारगांवच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांची उत्तरीय तपासणी केली. पोलीस निरीक्षक भैरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जावेद रोटीवाले व एस. आर. पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू