शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

ए. वाय. पाटलांनी स्वत: राजकीय आत्मघात करून घेतला, मंत्री हसन मुश्रीफांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 4:45 PM

ए. वाय. पाटील यांना जनतेने 'बिद्री'च्या निवडणुकीत जमिनीवर आणले

सरवडे : आपल्या कार्यकर्त्यांना विरोधकांच्या दावणीला बांधणाऱ्या आणि वरिष्ठांचे आदेश धुडकावणाऱ्या ए. वाय. पाटील यांना जनतेने 'बिद्री'च्या निवडणुकीत जमिनीवर आणले. परंतु स्वतःच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडणाऱ्या ए.वाय. यांनी आत्मपरीक्षण करावे. त्यांनी राजकीय आत्मघात करून घेतल्याचा घणाघात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या वतीने नरतवडे येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार के.पी. पाटील होते.मुश्रीफ म्हणाले, मेहुण्या-पाहुण्यांचे नातेसंबंध टिकावेत यासाठी नेहमी प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असताना ते शिंदे गटात जाणार, भाजप प्रवेश व महामंडळावर निवड होणार अशा चर्चा होत्या. बिद्रीच्या निवडणुकीत त्यांच्या अटीशर्ती मी मान्य केल्या, पण आम्हाला खेळवत त्यांनी विरोधकांशी हातमिळवणी केली. ते स्वाभिमानी कार्यकर्त्यांना रुचले नाही. ते पराभवाने उद्विग्न झाले असून खोटेनाटे आरोप करत आहेत. पण त्यांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी हिमालयासारखा उभा असून जिल्हा बँकेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्व कामासाठी कार्यकर्त्यांनी मला थेट भेटावे.के. पी. पाटील म्हणाले, पहिल्या निवडणुकीपासून राधानगरीच्या जनतेने मला पाठबळ दिले. परंतु मध्यंतरी आमदारकीच्या दहा वर्षांच्या काळात सोळांकुरच्या टोलनाक्याने आपल्यात व जनतेत अंतर आले. हा टोलनाकाच कायमचा बंद झाला आहे. जनतेने अडीअडचणी सोडविण्यासाठी थेट आपल्यापर्यंत यावे. माझ्या कार्यकर्त्यांची अडवणूक कराल तर खबरदार, असा सज्जड इशाराही त्यांनी ए.वाय. यांना दिला.यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, केडीसीसीचे संचालक भैय्या माने, तालुकाध्यक्ष व गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगले, भोगावतीचे संचालक धैर्यशील पाटील, हुतात्मा सूतगिरणीचे अध्यक्ष उमेश भोईटे, तानाजी ढोकरे, तानाजी खोत, नामदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.गोकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसीचे संचालक रणजितसिंह पाटील, अनिल साळोखे, विनय पाटील, मनोज फराकटे, विकास पाटील, अभिषेक डोंगळे, बिद्रीचे संचालक राजेंद्र पाटील, राजेंद्र भाटळे, फिरोजखान पाटील, धनाजी देसाई, पंडित केणे, मधुआप्पा देसाई, दीपक किल्लेदार, विश्वनाथ कुंभार, एकनाथ पाटील, अशोक चौगले आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरA. Y Patilए. वाय. पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफ