शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोल्हापुरात वादळी वाऱ्याने घेतला तरुणाचा बळी, वीज तारेला चिकटल्याने तडफडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 11:44 AM

झाडाच्या आडोशाला जात असतानाच रस्त्याकडेला पडलेली डीपीला जोडलेली उच्च प्रवाहित तार त्याच्या गळ्याला चिकटली

कोल्हापूर : अवकाळी पावसासह वादळवाऱ्यामुळे रस्त्याकडेला झाडाजवळ पडलेली उच्च प्रवाहित तार मानेजवळ चिकटून तरुणाचा जागीच तडफडून मृत्यू झाला. अप्पाजी नामदेव पोवार (वय १९, रा. शांतीनगर, उचगाव, ता.करवीर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री कात्यायानीजवळ घडली. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अप्पाजी पोवार व त्याचे सहकारी विनायक चव्हाण, अमर चव्हाण हे कॅटरर्सकडे कामाला आहेत. मागणीप्रमाणे विविध मंगल कार्यालय, लाॅन, खासगी शेती फाॅर्म येथे रोजच्या मानधनावर काम करतात. गुरुवारी (दि.११) सायंकाळी ते इतर सहकाऱ्यांसमेवत कात्यायानीजवळील एका फाॅर्म हाउसवर कामासाठी गेले होते. तेथून रात्री उशिरा काम आटोपून साडेबारा वाजण्याच्या सुमारास अप्पाजी पोवारसह दोघे सहकारी दुचाकीवरून घराकडे निघाले. यादरम्यान अप्पाजीने लघुशंकेसाठी मोटारसायकल थांबविण्यास सांगितली. अंधार, पाऊस पडल्याने येथे थांबायला नको असे मित्रांनी त्याला सल्ला दिला. मात्र, त्याने मोटारसायकल थांबावा असे सांगितले. त्यामुळे ती थांबविली व त्याने झाडाच्या आडोशाला जात असतानाच रस्त्याकडेला पडलेली डीपीला जोडलेली उच्च प्रवाहित तार त्याच्या गळ्याला चिकटली. त्यामुळे त्याचा क्षणार्धात तडफडून मृत्यू झाला.बराच वेळ झाला तो न आल्याने मित्रांनी हाका मारल्या पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. मोबाइलच्या बॅटरीत शोध घेतला असता अप्पाजी जमिनीवर पडला होता. विनायक चव्हाणने पोलिस, अग्निशमन दलासह इतर मित्र आणि वीज वितरण कंपनीचे कर्मचाऱ्यांशी मदतीसाठी संर्पक साधला. घटनास्थळी वीज वितरण कर्मचारी दाखल होऊन विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर इतरांनी तरुणाला सीपीआर रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजDeathमृत्यू