नेसरी : कोरोनाच्या भयाण, कठीण परिस्थितीत गरीब व गरजू कोरोनाबाधितांना नेसरीचे आधार अलगीकरण केंद्र आधार ठरेल, असे प्रतिपादन चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केले.
जि. प. कोल्हापूर व नेसरी ग्रामपंचायतीतर्फे जि. प. सदस्य अॅड. हेमंत कोलेकर यांच्या निधीतून व लोकसहभागातून उभारलेल्या २५ बेडचे आधार अलगीकरण सेवा केंद्र उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रातांधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पाटील म्हणाले, अभ्यासू व्यक्तिमत्त्व कोलेकर यांनी अलगीकरण केंद्राची निर्मिती केल्याने कोरोना रुग्णांची चांगली सोय होण्यास मदत होणार आहे. अॅड. कोलेकर यांनी स्वागत व प्रास्ताविकात आधार अलगीकरण सेवा केंद्राचा उद्देश स्पष्ट करून केंद्राचे महत्त्व विशद केले. कोरोना योद्धा डॉ. हर्षद वसकले, डॉ. नीलेश भारती, डॉ. टी. एच. पाटील, डॉ. झेवियर डिसोझा, डॉ. सत्यजित देसाई, डॉ. विश्वजित शिंदे, कानडेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नसीम मुजावर, सर्जेराव रणदिवे, आशा, अंगणवाडी व आरोग्यसेविका यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव झाला.
यावेळी उपसरपंच अमर हिडदुगी, तावरेवाडी सरपंच दिनकर वळतकर, सरोळी सरपंच मारुती पाटील, सावतवाडी तर्फ नेसरी सरपंच धोंडीबा नांदवडेकर, शिप्पूरचे सरपंच बाबूराव शिखरे, तारेवाडी उपसरपंच युवराज पाटील, बिद्रेवाडी उपसरपंच राजेंद्र नाईक, महादेव साखरे, अभयकुमार देसाई, तानाजी गडकरी, शिवाजीराव हिडदुगी, माजी सरपंच वैशाली पाटील, अशोक पांडव, आदी उपस्थित होते.
संजय कालकुंद्रीकर यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच आशिषकुमार साखरे यांनी आभार मानले.
फोटो ओळी : नेसरी आधार अलगीकरण सेवा केंद्राचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांनी केले. यावेळी प्रातांधिकारी विजया पांगारकर, जिल्हा परिषदेचे सदस्य अॅड. हेमंत कोलेकर, आदी उपस्थित होते.
क्रमांक : १४०६२०२१-गड-०१