मलकापूर : मलकापूर येथील कॉलेज आवारातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी संशयित विशाल विठ्ठल चव्हाण (रा. महादेव टेकडी, मलकापूर, ता. शाहुवाडी) याच्यावर शाहुवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली महिती अशी, मलकापूर येथे फिर्यादी महिला ही अल्पवयीन मुलीसह येथे वास्तव्याला आहे. याच परिसरातील विशाल विठ्ठल चव्हाण हा संशयित तरुण फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा कॉलेजला जाताना वेळोवेळी पाठलाग करत होता. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे संदेश पाठवून प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे फिर्यादी महिलेने तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादीची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही संशयित तरुणाने रविवारी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद शाहुवाडी पोलिसात दिली आहे.