शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

अभिजित चौधरी कोल्हापूर महापालिकेचे नवे आयुक्त

By admin | Published: March 25, 2017 12:42 AM

पी. शिवशंकर यांच्या बदलीचे ठिकाण अस्पष्ट

कोल्हापूर : महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून डॉ. अभिजित चौधरी यांची शुक्रवारी नियुक्ती झाली. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महापालिकेला ही माहिती प्राप्त झाली. दरम्यान, विद्यमान आयुक्त पी. शिवशंकर यांची बदली कुठे झाली हे समजू शकले नाही. मूळचे जळगाव जिल्ह्यातील असलेले चौधरी २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. औरंगाबादला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी दोन वर्षे काम केले आहे. भंडारा येथे गेल्या नऊ महिन्यांपासून ते जिल्हाधिकारी होते. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे कार्यकर्ते व विधानपरिषदेचे आमदार परिणीत फुके यांच्याशी त्यांचे मतभेद झाले; त्यातूनच त्यांची बदली झाल्याची चर्चा भंडारा जिल्ह्यात आहे. अभिजित चौधरी हे एम.बी.बी.एस. आहेत.चौधरी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून ३१ मार्चनंतर कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. शक्य तेवढे चांगले काम करण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पी. शिवशंकर यांनी ३१ जानेवारी २०१५ रोजी कोल्हापूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून कार्यभार घेतला होता. त्यांना येथे काम करण्यासाठी केवळ दोन वर्षांचा कालावधी मिळाला. या काळात त्यांनी महानगरपालिकेचे कामकाज आॅनलाईन करण्यास प्राधान्य दिले. ई-आॅफिसच्या सर्व सुविधा त्यांनी दिल्या. आॅफिस रेकॉर्डचे डिजिटायझेशन करण्यावर त्यांनी अधिक भर दिला. त्यांच्या काळात नोकरभरतीही मोठ्या प्रमाणात झाली. ‘एक प्रामाणिक अधिकारी’ म्हणून त्यांची ओळख होती परंतु त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे अधिकारी व नगरसेवक पदाधिकाऱ्यांत मतभेद निर्माण झाले होते. त्याचे पडसाद कामकाजावर सतत उमटत राहिले. (प्रतिनिधी)