कोल्हापूर : राज्यातील गडचिरोली या नक्षलवादी भागात कौतुकास्पद केलेल्या कामगिरीची दखल घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना केंद्र शासनाच्यावतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहिर करण्यात आले आहे. याशिवाय जिल्ह्यातील इचलकरंजी पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश बिराजदार, कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २१ अधिकाऱ्याना हे पदक बुधवारी जाहिर झाले.केंद्र सरकारच्यावतीने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना नक्षलवादी भागात खडतर सेवा पार पाडल्याबद्दल गृह विभागाच्यावतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक दिले जाते. हे पदक महाराष्ट्रात नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गोदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भरघोष योगदान देणाऱ्या पोलीस अधिकार्यांना दिले जाते.
या नक्षलवादी भागात अतुलनीय कामगिरी केलेले व सद्या कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या २१ जणाना हे पदक जाहिर करण्यात आले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, इचलकरंजी पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश बिराजदार, कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, तसेच सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर (गांधीनगर पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील (जयसिगंपूर पोलीस), राहूल वाघमारे (शाहूपुरी पोलीस), रविकांत गच्चे (गोकुळ शिरगाव पोलीस), अतूल कदम (गांधीनगर), प्रितम पुजारी (कागल पोलीस), निखील खर्चे (कागल पोलीस), विवेक राळेभात (करवीर पोलीस), विक्रांत चव्हाण(करवीर पोलीस), अभिजीत भोसले (करवीर पोलीस), योगेश पाटील (जुना राजवाडा पोलीस), सचिन पांढरे (शाहुपूरी पोलीस), सोमनाथ कडवे (गावभाग, इचलकरंजी), प्रमोद मगर (शिवाजीनगर, इचलकरंजी), राजेंद्र यादव (शहापूर, इचलकरंजी), गणेश खराडे (शहापूर, इचलकरंजी) याचा समावेश आहे.