शिवाजी सावंत ---गारगोटी --भुदरगड तालुक्यातील धक्कादायक निकालाने राष्ट्रवादी काँग्रेस धोकादायक स्थितीत पोहोचला. आगामी होणाऱ्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत विचार करायला लावणारा आहे. काँग्रेसला अंतर्गत बंडाळीचा फटका बसला असून, त्यांना एक जागा गमवावी लागली; परंतु राहुल देसाई यांनी गारगोटी मतदारसंघात दिलेल्या एकाकी झुंजीमुळे काँग्रेसची अब्रू वाचली आहे. आमदार आबिटकर गटाच्या आघाडीने जि.प.च्या दोन, तर पंचायत समितीत पाच जागा मिळवून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपला एक पंचायत समितीच्या जागेवर समाधान मानावे लागले. आमदार प्रकाश आबिटकर गटाच्या शाहू आघाडीने जिल्हा परिषदेच्या पिंपळगाव व कडगाव या दोन, तर पंचायत समितीच्या कडगाव, मठगाव, पिंपळगाव, पुष्पनगर, कूर या पाच जागा जिंकून तालुक्यात पकड घट्ट केली आहे. तर आकुर्डे मतदारसंघात मौनी विद्यापीठचे विश्वस्त मधुकर देसाई यांचा निसटता पराभव झाला. कडगाव मतदारसंघात माजी आमदार दिनकरराव जाधव आणि के. जी. नांदेकर यांनी राष्ट्रवादीचे पानिपत केले. आकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघ खुला झाल्याने या मतदारसंघात इच्छुकांची गर्दी होती. त्यामुळे अनेक नाराजांनी बंडाचा झेंडा दाखवून काहींनी अपक्ष, तर काहींनी पक्षांतर केले होते. यामध्ये राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही म्हणून प्रकाश पाटील, संतोष मेंगाणे, तानाजी खोत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. तर राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष देवराज बारदेस्कर यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली. यामध्ये त्यांनी तीन हजार मतांपेक्षा अधिक मते घेऊन राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. याचा फायदा काही प्रमाणात आघाडीला मिळाला. घटलेल्या मताधिक्याने राष्ट्रवादी अडचणीत सापडली होती; परंतु जीवन पाटील यांनी या मतदारसंघात केलेली लोकांची वैयक्तिक कामे आणि जनसंपर्क यामुळे ते निवडून येऊ शकल,े अन्यथा या पक्षाला तालुक्यात एकही जागा मिळाली नसती. प्रवीण नलवडे यांनी तिकीट नाकारले म्हणून काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये डेरेदाखल झाले आणि विजय मिळविला. या मतदारसंघातील जि. प. सदस्या रूपाली पाटील यांचे पती प्रदीप पाटील यांना मतदारांनी नाकारले आहे. कूर पंचायत समिती गणातून नाधवडे येथील राष्ट्रवादीचे शंकर कृष्णा पाटील यांनी निकराची लढत दिली; परंतु ते आघाडीच्या अजित देसाई यांना रोखण्यात कमी पडले. उद्योगपती सयाजी देसाई यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणे पसंत केले होते. या मतदारसंघातील तरुणांनी देसाई यांच्या मागे उभे राहणे पसंत केले. पिंपळगाव गटातून रोहिणी आबिटकर यांनी मताधिक्याने विजय मिळवून आघाडीची पकड घट्ट केलीे. गतवळी या मतदारसंघातून प्राचार्य अर्जुन आबिटकर विजयी झाले होते. तर पिंपळगाव गणातून स्नेहल परीट यांनी राष्ट्रवादीचे माजी उपसभापती विश्वनाथ कुंभार यांच्या पत्नी विद्या कुंभार यांचा पराभव केला आहे. पुष्पनगर गणातून आघाडीचे सुनील निंबाळकर यांनी बाजी मारली आहे. कडगाव गटातून विद्यमान सदस्या सुनीता देसाई यांचा पराभव करून स्वरूपाराणी जाधव यांनी विजय मिळविला आहे. तर कडगाव गणातून राष्ट्रवादीच्या संजीवनी देसाई यांचा पराभव करून आघाडीच्या कीर्ती देसाई विजयी झाल्या. मठगाव गणातून सरिता संदीप वरंडेकर यांनी राष्ट्रवादीच्या दीपाली पंदारे यांचा पराभव केला. गारगोटी गटात काँग्रेस पक्षाच्या रश्मी देसाई यांनी आघाडीच्या विजयमाला चव्हाण व राष्ट्रवादीच्या संजीवनी आबिटकर यांचा पराभव करून विजय मिळविला आहे. या मतदारसंघात काँग्रेसची ताकद तुलनेने कमी आहे. त्यात बंटी पाटील यांचा तालुक्यातील गट नेमका कोठे होता, हा संशोधनाचा विषय आहे. या सर्व अडचणींवर मात करून राहुल देसाई यांनी कडवी झुंज दिली. वैयक्तिक मतांनी त्यांना विजयाप्रत पोहोचविले आहे. विजयी झाले. या गणात राष्ट्रवादी गारगोटी गणातून काँग्रेसच्या गायत्री संदेश भोपळे यांनी राष्ट्रवादीच्या प्रियांका भोपळे व आघाडीच्या अर्चना पांगिरेकर यांचा पराभव करून विजय मिळविला आहे. तर मडिलगे गणातून राष्ट्रवादीचे संग्राम देसाई हे आघाडीचे उमेदवार शिवाजी ढेंगे यांचा पराभव करून विजयी झाले. या गणात राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने दमदार उमेदवारी देण्यात आली होती. ढेंगे यांचा विजय निश्चित मानला जात असताना हा आघाडीला धक्का बसला आहे.
भुदरगडवर आबिटकरांचे वर्चस्व --जिल्हा परिषद विश्लेषण गारगोटी
By admin | Published: February 24, 2017 9:42 PM