शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

साडेपाच हजारावर ज्येष्ठ नागरिकांनी घेतली कोविड लस, वेबसाईटवर नोंदणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 11:06 AM

Corona vaccine Kolhapur-कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सुरू असलेल्या ज्येष्ठ व व्याधीग्रस्तांच्या लसीकरणाने वेग धरला असून पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने दुसऱ्या दिवशी ३ हजार ४७२ जणांनी लस टोचून घेतली. लसीकरण करण्याकरिता कोविड या वेबसाईटवर नोंदणी करण्यासाठीही प्रतिसाद वाढत आहे. मंगळवारी ४ हजार नागरिकांनी यावर नोंदणी केली होती, ती आठ हजारावर गेली आहे.

ठळक मुद्देसाडेपाच हजारावर ज्येष्ठ नागरिकांनी घेतली कोविड लसतिसऱ्या टप्प्यांतर्गत ज्येष्ठ व व्याधीग्रस्तांच्या लसीकरणाला वेग

कोल्हापूर : कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सुरू असलेल्या ज्येष्ठ व व्याधीग्रस्तांच्या लसीकरणाने वेग धरला असून पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने ३ हजार ४७२ जणांनी लस टोचून घेतली. लसीकरण करण्याकरिता कोविड या वेबसाईटवर नोंदणी करण्यासाठीही प्रतिसाद वाढत आहे. मंगळवारी ४ हजार नागरिकांनी यावर नोंदणी केली होती, ती आठ हजारावर गेली आहे.कोरोना संसर्गापासून बचावासाठी कोविड लसीकरण सोमवारपासून सुरू झाले आहे. यात ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त, तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यासाठी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील १२० केंद्रे निश्चित केली आहेत. आतापर्यंत लस घेतलेल्यांचा आकडा ५ हजार ६९८ वर पोहोचला आहे. कोल्हापुरात पहिले दोन दिवस आरोग्य यंत्रणेचे नियोजनात गेल्यानंतर खऱ्याअर्थाने बुधवारपासून प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात झाली. बुधवारी ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त ४५७, तर १७६९ ज्येष्ठ अशा २२२६ जणांनी लस आरोग्य केंद्रावर जाऊन टोचून घेतली. गुरुवारीही लसीकरणासाठी प्रतिसाद वाढला. ४९० व्याधीग्रस्त, तर २९८२ ज्येष्ठ असे एकूण ३ हजार ७२ जणांनी लसीकरण करून घेतले.सरकारी आरोग्य केंद्रात मोफत लसीकरण असल्याने साहजिकच गर्दी जास्त आहे. खासगी रुग्णालयातही अहोरात्र लसीकरणाची सोय केली आहे. तेथे अडीचशे रुपये फी आकारण्यात येत आहे. ज्यांना परवडते ते नागरिक खासगीमध्ये जाताना दिसत आहेत, पण सरकारीकडे ओढा जास्त असल्याचे शहरातील केंद्रावर झालेल्या गर्दीवरून दिसत आहे.नियमित लसीकरण सुरूचज्येष्ठ आणि व्याधीग्रस्तांबरोबरच नियमित लसीकरणही सुरूच आहे. यात हेल्थ वर्कर २८ हजार ५३७, तर फ्रंटलाईनवरील १० हजार ६६४ जणांनी आतापर्यंत कोविड लस टोचून घेतली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkolhapurकोल्हापूर