शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Kolhapur: फसवणुकीच्या गुन्ह्यात आठ वर्षांपासून फरारी वकिलास अटक, ११ गुन्ह्यांमध्ये लोकांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:17 IST

तीन वर्षांची शिक्षा भोगून पळाला होता

कोल्हापूर : जमीन खरेदीसाठी हातउसने घेतलेल्या पाच लाखांतील चार लाख ६९ हजार रुपये परत न देता फसवणूक करणारा वकील अमोल आनंदराव पाटील (वय ५०, रा. नेजदार पार्क, कसबा बावडा) याला शाहूपुरी पोलिसांनी पुण्यातून अटक केली. सप्टेंबर २०१६ मध्ये त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ॲड. पाटील याच्यावर फसवणुकीचे ११ गुन्हे दाखल असून, तीन वर्षांची शिक्षा भोगून तो पळाला होता.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे फिर्यादी उदय मानसिंगराव पोवार (वय ४२, रा. रमणमळा, कोल्हापूर) यांच्याशी ॲड. पाटील याची ओळख झाली होती. याच ओळखीतून त्याने ऑगस्ट २०१६ मध्ये पोवार यांच्याकडे जमीन खरेदीसाठी हातउसने दहा लाख रुपये मागितले. सुरुवातीला पोवार यांनी पैसे देण्यास नकार दिला.मात्र फारच गळ घातल्याने आणि नोटरी करून सहा महिन्यांत सर्व पैसे परत करण्याचा शब्द दिल्याने पोवार यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये त्याला पाच लाख रुपये दिले. सहा महिने उलटल्यानंतर वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळत नसल्याने पोवार यांनी पाटील याच्या नातेवाईकांना फोन लावले. त्यानंतर केवळ ३१ हजार रुपये मिळाले. उर्वरित पैसे मिळत नसल्याने अखेर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.दरम्यान, ॲड. पाटील याला दुसऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यात तीन वर्षे कारावासाची शिक्षा झाली. शिक्षा भोगून सुटल्यानंतर पसार झालेल्या संशयितास अखेर पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनी पुण्यातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता, त्याची १७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी झाली.

फसवणुकीचे ११ गुन्हेॲड. पाटील याच्यावर कोल्हापूर, गारगोटी, जयसिंगपूर, सांगली, पुणे येथे फसवणुकीचे ११ गुन्हे दाखल आहेत. कमी पैशात वादातील प्लॉट, शेतजमीन मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने अनेकांना गंडा घातला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये तीन वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर तो मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांमध्ये ओळख लपवून राहत होता. अखेर पुण्यात पोलिस पोलिसांच्या हाती लागला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरadvocateवकिलfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस