तलावाच्या तिन्ही बाजूस मोठ्या डोंगररांगा असल्याने येथे जोरदार होणा-या पावसामुळे पाण्याबरोबर येणारा गाळ मोठ्या प्रमाणात तलावात साठला जात होता. याचा परिणाम अनेक वर्षांपासून पाणीसाठ्यावर होत होता. त्यामुळे भर उन्हाळ्यात आसपासच्या शेतक-यांना पाण्याचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे शेकडो हेक्टर शेतातील पिके वाळत होती. शेतक-यांच्या तक्रारी लक्षात घेऊन ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या योजनेतून कोल्हापूर पाटबंधारे विभागाकडून जिल्हात प्रायोगिक तत्वावर काम सुरू होते. या लघु प्रकल्पाचे स्रोत बळकटी करण्याचे काम पूर्ण झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होणार आहे.
येथील धरणाच्या लाभ क्षेत्रात असणारे शेतकरी काही धरणग्रस्त असून ज्या शेतक-यांच्या जमिनी ओलिताखाली नव्हत्या त्या जमिनीमध्ये काही शेतक-यांनी गाळ टाकून पिकास योग्य केल्या आहेत. पाणीसाठा मुबलक होणार असल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
कोट..
तलावातील गाळ काढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होणार असल्याने उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्यातील अडचण दूर होईल. संबंधित अधिका-यांनी वेळोवेळी लक्ष ठेवल्याने गाळ काढण्याचे काम समाधानकारक झाले आहे.
महिपती पाटील
शेतकरी
फोटो : नांदारी (ता. शाहूवाडी) येथील तलावातील गाळ काढण्यात आला.