शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

एसीबीची दोन ठिकाणी कारवाई, २ हजार स्वीकारताना हुपरीचा तलाठी सापळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 5:35 PM

प्रथम कंत्राटी पध्दतीवर व त्यानंतर कायमस्वरुपी कामावर आदेश काढून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सीपीआरमधील वाहनचालक राहूल प्रल्हाद बट्टेवार यास आणि विंधन विहिरीची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या हुपरी येथील तलाठी कल्लाप्पा देवाप्पा शेरखाने या दोघांना लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले.

ठळक मुद्देएसीबीची दोन ठिकाणी कारवाई२ हजार स्वीकारताना हुपरीचा तलाठी सापळ्यात

कोल्हापूर - प्रथम कंत्राटी पध्दतीवर व त्यानंतर कायमस्वरुपी कामावर आदेश काढून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सीपीआरमधील वाहनचालक राहूल प्रल्हाद बट्टेवार यास आणि विंधन विहिरीची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या हुपरी येथील तलाठी कल्लाप्पा देवाप्पा शेरखाने या दोघांना लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले.२  हजाराची लाच घेताना तलाठी जाळ्याततक्रारदार याने मे 2020 मध्ये हुपरी गावातील त्याच्या गटक्रमांक 1876 मधील शेतामध्ये बोरवेल मारली आहे. याची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी आरोपी तलाठी कल्लाप्पा देवाप्पा शेरखाने (व.व. 54, रा. प्लॉट क्र. 54 संभाजीपूर अण्णासाहेब चकोते शाळेसमोर) याच्याकडे 16 जून रोजी अर्ज दिला होता तेव्हा तक्रारदार कोतवाल मुदाळे यांना भेटले असता तलाठी शेरखाने बोरवेलची नोंद घेण्यासाठी 3 हजार रुपये मागत आहेत पैसे दिल्याशिवार ते तुमच्या बोरवेलची नोंद सातबाऱ्यावर करणार नाहीत तेव्हा तुम्ही त्यांना जाऊन भेटा असे सांगितले. त्याबाबत तक्रारदारने तलाठी शेरखाने विरुध्द तक्रार अर्ज दिला होता.त्यानुसार आज हुपरी तलाठी कार्यालयामध्ये शासकीय पंच साक्षीदाराच्या समक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता पडताळणीमध्ये शेरखाने याने तडजोडीअंती 2 हजार रुपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आज लावलेल्या सापळ्यात 2 हजार रक्कम स्वीकारताना तलाठी शेरखाने रंगेहात सापडला. हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, हवलदार मनोज खोत, जवान शदर पोरे, नवनाथ कदम, सुनील घोसाळकर यांच्या पथकाने केली.लाचेच्या अथवा अपसंपदेबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी लाच- लुचपत प्रतिबंधक विभाग टोल फ्री क्रमांक 1064, 0231-2540989, व्हॉटस् ॲप क्रमांक- 7875333333, 9011228333 यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधिक्षक बुधवंत यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर