शासनाने महाविद्यालयांना त्यांच्या प्रस्तावानुसार गेल्या चार वर्षांमध्ये तुकडी वाढवून दिली आहे. साधारणत: एका तुकडीतील विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता ८० ते १२० इतकी आहे. या मंजूर क्षमतेनुसार यंदा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यावर्षी कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेसाठी एकूण ९८०६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. एकूण प्रवेशक्षमता १४६८० इतकी असून तिच्या तुलनेत ५०५४ इतके अर्ज कमी दाखल झाले आहेत. तिन्ही विद्याशाखेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा अर्जांची संख्या कमी आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली असून सध्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून निवड यादी तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रतिक्रिया
मंजूर प्रवेश क्षमतेनुसार महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश होतील. पहिल्या फेरीत ज्यांनी अर्ज केले नाहीत. ज्यांचे अर्ज अपात्र ठरले त्यांनी दुसऱ्या फेरीमध्ये अर्ज करता येणार आहे. ही फेरी त्यांच्यासाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश घेण्यासाठीची अंतिम संधी असणार आहे.
-सुभाष चौगुले, सचिव, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती
चौकट
यंदा तुकडी वाढवावी लागणार नाही
यावर्षी अकरावीसाठी प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज दाखल झाल्याने महाविद्यालयांना कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेची तुकडी वाढवावी लागणार नसल्याचे चित्र आहे.
प्रवेशाची पुढील प्रक्रिया अशी
दि. ७ सप्टेंबर : निवड यादीची प्रसिद्धी
दि. ७ ते ८ सप्टेंबर : तक्रार निवारणाची प्रक्रिया
दि. ८ ते १५ सप्टेंबर : प्रवेश निश्चित करणे
शाखानिहाय दाखल झालेले अर्ज
विज्ञान : ५५३७
वाणिज्य (मराठी) : १६४३
वाणिज्य (इंग्रजी) : १३८४
कला (मराठी) : ११७२
कला (इंग्रजी) : ६९