शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Kolhapur- सहापदरी महामार्गाचा विचका : धोकादायक खोदकाम, खड्डे, अपूर्ण काम; सूचना फलकांचा अभाव

By संदीप आडनाईक | Published: June 19, 2024 12:29 PM

सातारा-कोल्हापूर-कागल या राज्यमार्ग क्रमांक ४ च्या सहापदरीकरणाचे काम सुरू 

संदीप आडनाईककोल्हापूर : रोज किमान ९० हजार वाहनांची वर्दळ असणाऱ्या स्वप्निल स्वर्णिम चतुर्भुज परियोजनेतील सातारा-कोल्हापूर-कागल या राज्यमार्ग क्रमांक ४ च्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु, ठिकठिकाणी धोकादायक खोदकाम, महामार्गाला लागून असलेले खड्डे, बाजूपट्ट्यांवरचे अपूर्ण काम, वळण रस्ते, उपमार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यांना नसलेले फलक, सांडपाणी तसेच पावसाचे साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी, उघड्या सळ्या यामुळे अपघाताला निमंत्रण देणारा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा हा प्रकल्प म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा ठरत आहे.कर्नाटकच्या हद्दीतील कागल तालुक्यातील कोगनोळी गावापासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील घुणकी येथील वारणा नदीवरच्या पुलापर्यंतच्या या पुणे ते बंगळुरू या राष्ट्रीय (जुना नंबर-एन.एच.४) महामार्गावरील कामाची पाहणी लोकमतच्या प्रतिनिधीने सोमवारी केली. ४५ किलोमीटरच्या या प्रवासासाठी पाऊण तास लागण्याची अपेक्षा असताना दीड तास लागला. या प्रवासात वाहनधारकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते याची प्रचिती आली. सहापदरीकरणाचे बंगळुरूपासून कागलपर्यंतचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. परंतु, कागलपासून वारणा नदीवरील पुलापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे आणि सांडपाण्याचे साम्राज्य आहे. तेथे शेवाळ निर्माण झाल्याने दुर्गंधी येते ती वेगळीच.काम पूर्ण तरी मध्यभागी दाेन फूट उंचवटेउजळाईवाडी जवळ बाजूपट्ट्याचे समतलीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ता पूर्ण आहे, मात्र उंचवट्यामुळे दोन भाग झाले आहेत. तेथील दोन फूट उंच उंचवटा तसाच आहे. संपूर्ण महामार्गावर सुमारे १३ ते १४ ठिकाणी वळण रस्ते आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर धोकादायक पद्धतीने चुकीच्या दिशेने वाहनांना जावे लागते. गोकूळ शिरगावच्या रस्त्यावर पाइपलाइनचे तोंड उघडेच आहे. पाणी साठल्यास येथे उतार समजून येत नसल्याने अपघाताची शक्यता आहे. लक्ष्मी टेकडीजवळ पाइपलाइनवर धोकादायक पद्धतीने सळया दिसतात.फलकांचा अभाव...अनेक ठिकाणी जेसीबीने दगड फोडण्याचे काम सुरू आहे. तेथे फलकच नाहीत. तावडे हॉटेल परिसरात कोल्हापूरकडे वळण्यासाठीही फलक नाही, त्यामुळे बाहेरचे प्रवासी गोंधळून जातात. तावडे हॉटेलपासून सांगली फाट्याजवळ महामार्गावर ठळक अक्षरात वळण रस्त्याचा फलक नाही. सांगलीकडे वळायचे त्या पुलाखाली अवैध वाहतूक करणारी वाहने थांबून आहेत. शिरोली एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बोगदा तर अस्वच्छतेचे आगार बनलेले आहे. बोगद्यात ठिकठिकाणी माती आणि दगडांचे खच पडलेले आहेत.

समतलीकरण न केल्याने उंचवटे अपघाताला कारणीभूतसादळे-मादळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील वळण रस्ता धोकादायक आहे. येथे अनेक वाहने चुकीच्या दिशेने येतात. मंगरायाचीवाडी येथील वळण रस्त्याच्या बाजूला जोडलेल्या दोन रस्त्यांच्या मध्यभागातील चरी बुजविलेल्याच नाहीत. अनेक ठिकाणांचे समतलीकरण न केल्याने उंचवटे अपघाताला कारणीभूत ठरतात. एकूण वाहनधारकांना या मार्गावर सुलभ प्रवास करता येत नाही.अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांची अडवणूकमहामार्गावर बाहेरून येणाऱ्या तसेच जिल्ह्यातील प्रवाशांच्या वाहनांना वाहतूक पोलिस अडवणूक करताना आढळले. कागलच्या लक्ष्मी टेकडी परिसरात तसेच टोपजवळ या पोलिसांमुळेच वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग