शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

Accident News: काॅलेजबसला टेंपोची समोरासमोर धडक; २ जणांचा जागीच मृत्यू; २० विद्यार्थी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 11:06 PM

Accident News: बेळगाव जिल्ह्यातील अथणी-मिरज रोडवर  टेम्पो व कॉलेज बसची  मोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार तर 20 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे.

कोल्हापूर - बेळगाव जिल्ह्यातील अथणी-मिरज रोडवर  टेम्पो व कॉलेज बसची  मोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार तर 20 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. या अपघातातील जखमी झालेले अनेक विद्यार्थी गंभीर जखमी असून ते अकरावी आणि बारावीच्या वर्गात शिकत होते. सकाळी कॉलेजवर विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाला आहे. टेंपोने स्कुल बसला दिलेली धडक इतकी भयानक होती, की, दोन्हीही वाहानातील चालक जागीच ठार झाले असून बसमधील ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसलेले विद्यार्थी आणि शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. कॉलेजबसच्या केबिनमध्ये बसलेल्या एका शिक्षकाचा हात आणि पायही तुटला असून शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे हा अपघात घडला असून अपघातानंतर काही वेळातच त्याठिकाणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अथणी-मिरज मार्गअथणी-मिरज रोडवर तीन किलोमीटर अंतरावर बनजवाड येथे हायस्कूल आणि कॉलेज आहे. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास विद्यार्थ्यांना अथणी येथून घेऊन बस कॉलेजकडे निघाली होती. त्याचवेळी मिरजकडून अथणीकडे प्लास्टिक पाईप भरलेला आयशर टेम्पो येत होता.

दोन्ही ड्रायव्हर ठारअथणी शहरालगतच दोन्ही वाहनांमध्ये हा अपघात झाला. समोरासमोरा धडक बसल्याने दोन्ही वाहनाचे चालक जागीच ठार झाले, अपघातात वाहनाचे चालक ठार होताच स्कुलबसमधील मुलांनी हंबरडा फोडला होता. मालवाहतूक करणाऱ्या टेंपोने कॉलेजबसला धडक दिल्याने दोन्ही वाहनांच्या समोरील केबिनचा चक्काचूर झाला होता. दोन्ही वाहनं समोरासमोर धडकल्याने दोन्हीवाहनातील ड्रायव्हर वाहनामध्येच अडकून पडले होते.

शिक्षकांचा हात-पाय तुटलाया भीषण अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या एका शिक्षकांचा हात आणि पाय तुटला आहे, तर बस चालकाच्या बाजूला बसून प्रवास करणारे काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. आमदार श्रीमंत पाटील यांनी घटनास्थळी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका पाठवून तातडीने जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात पोचवण्याचे काम केले आहे. घटनास्थळी पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर