शहरं
Join us  
Trending Stories
1
Sourav Ganguly, Police Complaint: सौरव गांगुलीने केली तक्रार, कारवाई करण्यासाठी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; प्रकरण काय?
2
गणपती विसर्जन मिरवणुकीत भंडारा येथे इमारतीचा सज्जा खचला; ३ महिला गंभीर, ६ किरकोळ जखमी
3
Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी
4
महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’, नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढली, आभा पांडे बंडखोरीच्या भूमिकेत
5
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड
6
'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos
7
वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा
8
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
9
Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out
10
बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग
11
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
12
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी
13
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
14
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
15
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
16
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
17
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
18
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
19
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
20
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

कोल्हापूर: भाच्याच्या बारशाहून परताना आत्याचा अपघाती मृत्यू, ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 7:08 PM

मुलगी आणि भाऊ जखमी

शिवाजी सावंतगारगोटी: उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा धक्का लागून भाच्याच्या बारशाला गेलेल्या आत्याचा अपघाती मृत्यू झाला. साधना पांडूरंग चोरगे (वय २४, रा. अंतुर्ली, ता. भुदरगड) असे मृत महिलेचे नाव आहे. तर त्यांची मुलगी आणि भाऊ जखमी झाले. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक शिवाजी उत्तम डाफळे (रा. निळपण, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रोहित आनंदा कामते यांनी भुदरगड पोलिसात फिर्याद दिली.अधिक माहिती अशी की, बसरेवाडी ता. भुदरगड येथे आश्रम कामते यांच्या मुलाचे काल, रविवारी बारसे होते. या बारशासाठी आश्रम यांची बहीण साधना चोरगे आल्या होत्या. नामकरण सोहळा पार पडल्यावर दुपारी भाऊ आश्रम हा बहिण साधना आणि तिची एक वर्षाची मुलगी आर्या यांना घेवून दुचाकीवरून गावी करंजिवणे ता.कागल येथे निघाला होता. दारवाड कुर रस्त्यावर कोनवडे गावाजवळ ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करुन पुढे जात असताना त्यांच्या दुचाकीला धक्का लागून ते रस्त्याच्या डाव्या बाजूला पडले.या अपघात साधना गंभीर जखमी झाल्या. तर आर्या व आश्रम हे देखील गंभीर जखमी झाले. तिघांनाही कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, साधना यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तरुण विवाहितेच्या अपघाती निधनाने माहेर करंजिवणे, सासर अंतूर्ली तर बारसे असलेल्या बसरेवाडी या तीन गावांवर शोककळा पसरली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात