कोल्हापूर : नवीन अभ्यासक्रमानुसार दहावीची यावर्षी पहिलीच परीक्षा होणार आहे. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण १ लाख ४१ हजार ७० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २९०६ इतकी आहे. या परीक्षेचा प्रारंभ शुक्रवारी (दि. १ मार्च) सकाळी ११ वाजता मराठी विषयाच्या पेपरने होणार आहे.या परीक्षेत गणित आणि इंग्रजी विषयाची बहुसंच प्रश्नपत्रिका पद्धत यावर्षीपासून बंद झाली आहे. नवीन अभ्यासक्रम आणि बदललेल्या मूल्यमापन पद्धतीनुसार पहिलीच परीक्षा होणार आहे. कोल्हापूर विभागातील एकूण ३५४ केंद्रांवर परीक्षा होणार असून, त्यावर २१ भरारी पथकांची नजर राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी सात भरारी पथके असणार आहेत.
विभागातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांची प्रवेशपत्रे आॅनलाईन पद्धतीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहेत. परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे शिक्षण मंडळाचे विभागीय सहसचिव टी. एल. मोळे यांनी सांगितले.
आकडेवारी दृष्टिक्षेपातजिल्हा विद्यार्थी (नवीन अभ्यासक्रम) परीक्षा केंद्रकोल्हापूर ५६७५८ १३६सांगली ४१२७६ १०३सातारा ४३०३४ ११५