शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

डिजिटल, इलेक्ट्रॉनिक पुरावे आता न्यायालयात ग्राह्य धरणार

By उद्धव गोडसे | Published: July 02, 2024 4:25 PM

दस्तऐवज व्याख्येत समावेश, कायद्यांचे देशीकरण करण्यावर भर

उद्धव गोडसेकोल्हापूर : केंद्र सरकारने बदललेल्या फौजदारी कायद्यांनुसार आता न्यायालयात डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. भारतीय साक्ष कायद्यातील दस्तऐवज व्याख्येत नवीन पुराव्यांचा समावेश केला आहे. गुन्हे गतीने निकाली काढण्यासाठी याचा फायदा होईल, असा विश्वास कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केला.गुन्हेगारांना दंड देणे हा भारतीय दंड संहितेचा उद्देश होता. त्याऐवजी पीडितांना न्याय देणे हा भारतीय न्याय संहितेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे न्याय संहितेमध्ये गुन्ह्याचा तपास, संशयितांवरील आरोपपत्र वेळेत दाखल होऊन खटला गतीने निकालात निघावा, यासाठी कालमर्यादांना महत्त्व दिले आहे.न्यायालयात पुरावे सादर करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा, यातून खटल्याचे कामकाज गतीने व्हावे आणि पीडितांना वेळेत न्याय मिळावा यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. ई-मेल, पोर्टल, वेब पेज, स्मार्ट फोनवरील दस्तऐवज पुरावे मानले जातील. मोबाइलवरील व्हिडिओ रेकॉर्डिंगदेखील डॉक्युमेंटरी पुरावा म्हणून सादर करता येणार आहे. खटल्यांचे कामकाज गतिमान होण्यासाठी हे बदल उपयुक्त ठरणार आहेत.

 जुन्या व नवीन कायद्यातील कलमेजुना कायदा कलमे - नवीन कायदा कलमेभारतीय दंड संहिता - ५११ - भारतीय न्याय संहिता - ३५८फौजदारी प्रक्रिया संहिता - ४८४ - भारतीय नागरी सुरक्षा - ५३१भारतीय पुरावा कायदा - १६७ - भारतीय साक्ष कायदा - १७०

पुरातन संज्ञा हटवल्याकायद्यांचे देशीकरण करताना केंद्र सरकारने पुरातन संज्ञा हटवण्यास प्राधान्य दिले. ब्रिटिशांचा संसद प्रांतीय कायदा, कॉमनवेल्थ प्रीव्ही कौन्सिल, क्विन्स प्रिंटर अशा वसाहतवादी संज्ञा काढून टाकल्या आहेत. वकील, प्लीडर, बॅरिस्टर या शब्दांची जागा आता ॲडव्होकेट या शब्दाने घेतली आहे.अनावश्यक कलमे हटवलीभारतीय दंड संहितेमध्ये ५११ कलमांचा समावेश होता. त्याऐवजी भारतीय न्याय संहितेमध्ये केवळ ३५८ कलमांचा समावेश आहे. नव्या कायद्यात समान गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या कलमांचे एकत्रीकरण करण्यात आले. विविध प्रकारच्या चोरीच्या कलमांचा समावेश आता केवळ ४१० ते ४१४ अशा पाच कलमांमध्येच करण्यात आला आहे. नागरी सुरक्षा आणि साक्ष कायद्यात मात्र कलमांची संख्या वाढवली आहे.

काही गुन्ह्यांमधील शिक्षेच्या तरतुदीत असलेली असंदिग्धता काढून स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे. कलमांची व्याख्या आणि शिक्षा यात सुसूत्रता आणली. हे बदल स्वागतार्ह आहेत. - ॲड. शिवाजीराव राणे - ज्येष्ठ वकील

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी