कोल्हापूर : राज्यभर गाजलेल्या शाळकरी मुलगा दर्शन शहा खून खटल्यात संशयित आरोपी योगेश ऊर्फ चारू आनंदा चांदणे (वय २७, रा. सुश्रुषा कॉलनी, देवकर पाणंद) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सोमवारी दोषी ठरविले. यासंबंधी मंगळवारी होणाºया अंतिम सुनावणीत आरोपी चांदणे याने म्हणणे मांडल्यानंतर शिक्षा सुनावली जाणार आहे.
२५ तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या खंडणीसाठी दि. २५ डिसेंबर २०१२ ला देवकर पाणंद येथील दर्शन रोहित शहा या शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता.
याप्रकरणी संशयित आरोपी चारू चांदणे याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी दि. २० जानेवारी २०१५ पासून येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश बिले यांच्या न्यायालयात सुरू आहे.
ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ३0 साक्षीदार तपासून २२ परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी तयार करून खटला मजबूत केला होता. या अपहरण व खून खटल्यावर सोमवारी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यासाठी संशयित चांदणे याला सशस्त्र पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते.
न्यायाधीश बिले यांनी संशयित चांदणे याला दर्शन शहा याचा खंडणीसाठी अपहरण व खून करून मृतदेह विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहेस. तुझ्यावरील हा आरोप सिद्ध होऊन तू दोषी ठरला आहेस. तुला याबद्दल काही सांगायचे आहे का? अशी विचारणा केली; परंतु अॅड. निकम यांनी यासंबधी आपले म्हणणे मांडण्याची न्यायालयाकडून परवानगी घेत आरोपीला दोषी ठरविल्यामुळे त्याला मानसिक धक्का बसला आहे.
नैसर्गिक न्यायानुसार शिक्षेवर मत व्यक्त करण्यासाठी त्याला काही वेळ मिळावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि मुंबई बॉम्बस्फोटातील खटल्यांसह अजमल कसाब खटल्यातही शिक्षेवर मत व्यक्त करण्यास आरोपीला अवधी दिला होता. त्यामुळे चांदणे यालाही वेळ द्यावा, असे मत व्यक्त केले.
आरोपीचे वकील पीटर बारदेस्कर यांनी आक्षेप न घेतल्याने न्यायाधीश बिले यांनी कामकाज तहकूब करून पुढील सुनावणी मंगळवारी ठेवली. संशयित चांदणे याचे म्हणणे ऐकल्यानंतर शिक्षेसंबंधी अंतिम निर्णय होणार आहे.
चारूला फुटला घामन्यायालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर न्यायाधीश बिले यांनी आरोपी चारूला समोर बोलवताच त्याचे अंग थरथरले. अंगाला दरदरून घाम सुटला होता. हात जोडून तो न्यायाधीशांसमोर उभा राहिला. तुला दोषी ठरविण्यात आल्याचे न्यायाधीशांनी सांगताच त्याच्या चेहºयावरील भाव बदलले.
रडकुंडीला येत साहेब, मला या गुन्ह्यात गोवले आहे. न केलेल्या गुन्ह्याची पाच वर्षे मी शिक्षा भोगली आहे, असे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला.
आई-आजीला अश्रू अनावरदर्शन शहा याची आई स्मिता व आजी सुलोचना शहा या सुनावणीला उपस्थित होत्या. न्यायालयाने चारूला दोषी ठरविताच दोघींना अश्रूंचा बांध फुटला. जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांच्या कार्यालयात अॅड. निकम बसले होते. त्याठिकाणी त्यांची भेट घेऊन त्यांचे पाय धरले. साहेब, आमच्या मुलग्याला मारणाºया नराधमाला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी विनंती केली.