शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

खून प्रकरणातील आरोपीस जन्मठेप

By admin | Published: October 01, 2015 12:24 AM

२००८ मधील प्रकरण : जिल्हा न्यायालयाचा निकाल

ओरोस : प्रेम प्रकरणातून मालवण तालुक्यातील देवली माळरानावर सोनम भरत परब हिच्या १९ आॅक्टोबर २००८ रोजी झालेल्या खून प्रकरणी नित्यानंद ऊर्फ पप्पू सत्यवान कदम याला दहा हजार रुपये दंड व जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी सुनावली आहे.मालवण तालुक्यातील कांदळगांव येथील राहणारी सोनम हिच्यावर आचरा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिपाई म्हणून काम करणाऱ्या नित्यानंद ऊर्फ पप्पू सत्यवान कदम याचे प्रेम होते.सोनम ही रेवतळे मालवण येथे नीळकंठ जगन्नाथ कोळंबकर यांच्याकडे कामधंदा करून मालवण स. का. पाटील महाविद्यालयात शिकत होती. नित्यानंद याची आत्या ही सोनमची सख्खी काकी असल्याने त्याचे दररोज जाणे-येणे असायचे. यातून त्याचे एकमेकांवर प्रेम जडले.दरम्यान, नित्यानंद कदम ज्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काम करायचा त्या शाळेतील शिक्षण घेणाऱ्या एका मुलीशी त्याचे प्रेम होते. याबाबतची सविस्तर माहिती या दोन्ही मुलींना समजल्याने नित्यानंदला त्या एकमेकांशी संबंध ठेवू नये, असे सांगायच्या. त्यानंतर नित्यानंदने १९ आॅक्टोबर २००८ रोजी दुपारी अडीच वाजता सोनमला ‘मला आपल्या लग्नाविषयी बोलायचे आहे’, असे सांगून भरडनाका मालवण येथे बोलविले व मोटारसायकलने (एम एच ०७-४११६) तिला देवली माळरानावर निर्जनस्थळी घेऊन गेला व त्याठिकाणी तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला.याबाबत मालवण पोलिसांत २० आॅक्टोबर २००८ रोजी सोनम बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार मालवण पोलीस शोध घेत होते. दरम्यान, २५ नोव्हेंबर २००८ रोजी तब्बल एक महिन्याने देवली माळरानावर मृतदेह असल्याचे वृत्त समजताच पोलिसांनी माहिती घेऊन बेपत्ता सोनम हिच्या वडिलांना घटनास्थळी नेण्यात आले व मृतदेह दाखविण्यात आला असता त्यांना मृतदेहाची ओळख पटल्याने नित्यानंदवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दोषारोपपत्र सुनावणीमध्ये १९ साक्षीदार तपासण्यात आले. यात पंचांची भूमिका महत्त्वाची ठरली. शिवाय मुलीचे वडील भरत जगन्नाथ परब, बहीण शीतल तसेच पुरुषोत्तम जगदीश बागकर, भालचंद्र कोळंबकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या प्रकरणातील मृत सोनमने लिहिलेली चिठ्ठी नजीकच्या हॉटेलमधील कामगार पुरुषोत्तम बागकर याने मोटारसायकलवरून जाताना पाहिली होती. तसेच भालचंद्र कोळंबकर याने मालवण भरड नाका येथे समोरच्या एस.टी.डी. बुथवर फोन करून ती परत कोळंबकर याचे एस.टी.डी.वर स्वत: सोनम आली होती व पाणी पिल्याचे सांगितले. या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या होत्या.या प्रकरणी विविध कलमांखाली जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा, सहा महिने शिक्षा व पाच हजार दंड, सहा महिने शिक्षा अशी एकत्रित दहा हजार दंड आणि जन्मठेप शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी जिल्हा सरकारी अभियोक्ता अमोल सामंत यांनी काम पाहिले. (वार्ताहर)