शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Kolhapur: सीपीआरमधून पळून जाण्याचा आरोपीचा प्रयत्न; पाठलाग करून पोलिस, सुरक्षारक्षकांनी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 5:01 PM

या घटनेने पोलिसांची तारांबळ उडाली

कोल्हापूर : वैद्यकीय तपासणी करून चहासाठी थांबलेल्या एका आरोपीने पोलिसांच्या हाताला हिसडा मारून सीपीआरच्या आवारातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. अखेर त्याला पाठलाग करून पकडल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला.घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, एका चाळीस वर्षीय आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणले. तो विनयभंग प्रकरणातील आरोपी आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून झाल्यानंतर त्या आरोपीने चहा प्यायचा आहे, असे पोलिसांना सांगितले. त्यावेळी त्याला घेऊन आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्या बेड्या खोलल्या. सीपीआरच्या आवारातच चहा पिण्याच्या बहाण्याने आरोपी थांबला. मात्र, त्याने पोलिसांच्या हाताला हिसडा देऊन पळून जाण्याच्या प्रयत्न केला. अचानक झालेल्या प्रकाराने पोलिस भांबावले. त्यांनी सीपीआरच्या सुरक्षारक्षकांना मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यास सांगितले. यावेळी परिसरात बघ्याची मोठी गर्दी झाली होती. दहा ते वीस पावले तो पळून जात असताना त्याला पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले. घडलेल्या या प्रकाराने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना चांगलाच घाम फुटला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला.

बघ्यांची गर्दी अन पोलिसांची धावपळनेहमी गजबजलेल्या सीपीआरमध्ये अचानक आरोपीने पळ काढल्याने मोठी तारांबळ उडाली. पोलिस, सीपीआरचे सुरक्षारक्षक आणि नातेवाइकांनी पाहण्यासाठी आलेल्यांची गर्दी होती. या प्रकाराने आरोपीला पकडेपर्यंत पोलिसांची मोठी दमछाक झाली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई होणार का, अशी चर्चा उपस्थितांत होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयPoliceपोलिस