कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेची भीती न बाळगता तरुणांनी कष्टाच्या बळावर प्रामाणिक तयारी केली तर यशापासून कोणीही रोखू शकत नाही. अपयश हे येत राहते, त्याने खचून न जाता जिद्दीने वाटचाल सुरू ठेवावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी केले.
सरदार नाळे यांना नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळाली. त्याबद्दल सांगरूळ (ता. करवीर) खंडोबा दूध संस्थेच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान लोंढे होते. भगवान लोंढे म्हणाले, की सरदार नाळे यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन यश मिळवले. त्यांनी अल्पावधीत घेतलेली झेप, त्यांच्या जिद्दीमुळे ते आजच्या तरुणांचे आयडॉल आहेत.
संस्थेचे सचिव आनंदा पोवार यांनी स्वागत केले. यावेळी माजी उपसरपंच सचिन लोंढे, संस्थेचे संचालक कृष्णात लोंढे, शिवाजी मर्दाने, रघुनाथ भोसले, धोंडीराम सातपुते, कुंडलिक नाळे, एकनाथ नाळे, तानाजी तेली, रंगराव कोळी, महादेव लोंढे, कृष्णात पाटील, अतुल खाडे, योगेश घराळ आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : मुंबई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल सरदार नाळे यांचा सत्कार खंडोबा दूध संस्थेच्यावतीने करण्यात आला. यावेळी सचिन नाळे, अर्जून मोेहिते, भगवान लोंढे, कृष्णात लोंढे, कुंडलीक नाळे आदी उपस्थित होते. (फोटो-२६०३२०२१-कोल-खंडोबा)