कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील १५२३ वाहनांवर गुरुवारी दिवसभरात कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ११९ वाहने जप्त करण्यात आली, तर उर्वरित १४०४ वाहनांवर गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून ३ लाख १६ हजार ७०० रुपये दंड वसूल केला आहे. कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने ही कारवाई सुरू आहे.
कोरोनाची संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने नागरिकांच्यावर निर्बंध आणले आहेत. त्यासाठी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्र्यांना दंडाला सामोरे जावे लागत आहेत. जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात विनामास्क फिरणाऱ्या २६२ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ५० हजार ९०० रुपये दंड वसूल केला. तर मॉर्निंग वॉकप्रकरणी दोघांजणांकडून एक हजार रुपये दंड वसूल केला. याशिवाय अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असतााही ते विनापरवाना सुरू ठेवल्याबद्दल २९ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून २२ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.