शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जैविक कचरा टाकल्याप्रकरणी खासगी लॅबवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 6:10 PM

खासगी लॅबमधून तपासून झालेला जैविक कचरा टाकल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने महाद्वार रोडवरील साई पॅतोलॉजी लॅबवर कारवाई करीत पाच हजारांचा दंड वसुल केला. हा प्रकार शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकातील नेताजी तरूण मंडळाजवळ घडला. वाढत्या कौरोनााच्या पार्श्वभूमीवर जागरूक नागरीकांनी संबधित डॉक्टर व महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.

ठळक मुद्देनिवृत्ती चौकातील प्रकार परिसरातील नागरीकांनी संबधित डॉक्टरला धरले धारेवर

कोल्हापूर : खासगी लॅबमधून तपासून झालेला जैविक कचरा टाकल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने महाद्वार रोडवरील साई पॅतोलॉजी लॅबवर कारवाई करीत पाच हजारांचा दंड वसुल केला. हा प्रकार शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकातील नेताजी तरूण मंडळाजवळ घडला. वाढत्या कौरोनााच्या पार्श्वभूमीवर जागरूक नागरीकांनी संबधित डॉक्टर व महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.गुरूवारी सकाळी शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकातील नेताजी तरूण मंडळच्या शेडजवळील एका बाजूस खासगी लॅबमधून तपासून झालेला जैविक कचरा टाकण्यात आला होता. ही बाब परिसरातील नागरीकांनी प्रथम नगरसेवक अजित ठाणेकर यांना फोनवरूनकळविली. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी तत्काळ हजर झाले. त्यांनी कचरा टाकलेल्या ठिकाणाची पाहणी केली असता हा जैविक कचरा महाद्वार रोडवरील श्री साई पॅथोलॉजी लॅबचा असल्याचे पुढे आले. त्यांनी संबधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांनीही हा कचरा बायो वेस्ट जमा करणाऱ्या कंपनीकडे दिला होता. तो आम्ही येथे टाकला नसल्याचे सांगितले. त्यावर परिसरातील नागरीकांनी संबधित डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

यापुर्वीही असा प्रकार या परिसरात घडला असून या लॅबवर कडक कारवाई करावी. अशी मागणी केली. त्यानंतर संबधित डॉक्टरने असा प्रकार पुन्हा होणार नाही अशी हमी दिली. महापालिका आरोग्य विभागाने संबधित डॉक्टरांकडून योग्यरित्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट न लावल्याबद्दल पाच हजाराचा दंड वसुल केला. त्यानंतर येथील वातावरण निवळले. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर