कोल्हापूर : कांद्याच्या घाऊक व्यापारासाठी २५ मेट्रीक टन व किरकोळ व्यापारासाठी २ मेट्रीक टन इतका साठा मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत केंद्र शासनाने लागू केला आहे. यांचे उल्लंघन झाल्यास व्यापाऱ्यांविरूध्द जीवनावश्यक वस्तू अधिनियम कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
जिल्ह्यातील कांद्याचे घाऊक व किरकोळ व्यापारी यांना सूचित करण्यात येते की, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कांदा या जीवनावश्यक वस्तुंच्या साठवणुकीवर निर्बंध लागू करण्याबाबत केंद्र शासनाने २३ऑक्टोबर रोजीच्या अधिसूचना निर्गमित केली आहे. या आदेशाची सर्व संबंधितांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्याविरूध्द कारवाई करावी अशा सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्याविरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. अशा प्रकारे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुध्द कायदेशीर कारवाई करावी असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.