दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलकांनी आठ दिवसांची मुदत दिली असून या कालावधीत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीच्यावतीने देण्यात आला.
शिरढोण-नांदणी रस्ता गेल्या दोन वर्षांपासून खराब झाला आहे. रस्त्यातील खड्डा चुकविण्याच्या नादात अनेकदा अपघातही होत आहेत. रस्ता दुरुस्त करावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार लेखी मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने कृती समितीच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन रस्ता दुरुस्त करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी सरपंच चंद्रकांत चव्हाण, उपसरपंच संभाजी कोळी, शाबुद्दीन टाकवडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कृती समिती पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ - शिरढोण (ता. शिरोळ) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जे. सी. बागवान यांनी आश्वासनाचे लेखी पत्र आंदोलक विश्वास बालीघाटे यांना दिले. यावेळी सरपंच चंद्रकांत चव्हाण, शाबुद्दीन टाकवडे उपस्थित होते.