ठळक मुद्देमास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई सुरूचअग्निशमन विभागाकडून १३ मंगल कार्यालयांची तपासणी
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या शहरातील १८७ व्यक्तींवर महापालिका प्रशासनाने कारवाई करुन त्यांच्याकडून ३४ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरणे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. या गोष्टींचे पालन केले नाही म्हणून महानगरपालिका, के. एम. टी. आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाने ही कारवाई केली.
अग्निशमन विभागाकडून शहरातील १३ मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. यावेळी ताराबाई पार्क, कसबा बावडा व बाबूरावनगर येथील मंगल कार्यालयांना नऊ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.