इचलकरंजी : शासनाच्या ‘सेफ सिटी’ योजनेंतर्गत शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हींच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे व नियम मोडणाºयांना दंडात्मक कारवाईची नोटीस पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. या माध्यमातून पहिल्याच दिवशी वीसजणांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना आता वाहतुकीचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.इचलकरंजी शहरांतर्गत सर्व रस्ते, मुख्य चौक याठिकाणी ७३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ११२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये ११ पीटीझेड कॅमेºयांचा समावेश आहे. या ११२ कॅमेºयांद्वारे शहरातील सर्व प्रमुख चौक व रस्ते कव्हर झाले असून, त्याद्वारे आता वाहतुकीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
कॅमेºयात आढळणाºया तिब्बल सीट, मोबाईलवर बोलणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, सिग्नल तोडणे, फॅन्सी नंबरप्लेट, असे नियम मोडणाºयांचा फोटो घेऊन दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली जाणार आहे. नोटिसीमध्ये नियम मोडलेल्या व्यक्तीचा व वाहनांसह फोटो, वाहन क्रमांक, कारवाईचे ठिकाण, दंडात्मक कारवाईचे कलम व त्यानुसार होणारी दंडात्मक कारवाई याबाबतची माहिती असणार आहे. ही नोटीस मिळताच सात दिवसांच्या आत शहर वाहतूक शाखेशी संपर्क साधून दंड भरावा लागणार आहे. दिलेल्या कालावधीत वाहनधारक न पोहोचल्यास त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.
अशा कारवाईला सुरुवात झाली असून, सोमवारी (दि.११) पहिल्याच दिवशी वीसजणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात महसूलही गोळा होणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.सुरुवातीला दोन दिवस प्रबोधन करणारझेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभा करणाºयांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सिग्नल चौकात थांबलेल्या वाहतूक कर्मचाºयांमार्फत अशा वाहनधारकांना सुरुवातीला प्रबोधन केले जाणार आहे. त्यातूनही न ऐकणाºयांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून छायाचित्रासह नोटीस घरपोच होणार आहे.पीटीझेड कॅमेºयाच्या नजरेतून वाचणे अशक्यशहरातील मुख्य चौकांमध्ये पीटीझेड कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे सहा दिशांना फिरतात तसेच त्यातून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील वाहन व त्याचा नंबर स्पष्टपणे टिपला जातो. त्यामुळे त्याच्या नजरेतून वाचणे अशक्य असल्याने नियम पाळावेच लागणार आहे.वशिलेबाजीला लगामइचलकरंजी शहरामधील अनेक वाहनधारक वाहतूक पोलिसाने अडविल्यानंतर मोबाईलवरून नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, राजकीय नेते अशांना फोन जोडून देऊन, वशिला लावून सुटण्यासाठी प्रयत्न करण्याचे प्रमाण जास्त आहे. सीसीटीव्ही कॅमेºयाच्या कारवाईमुळे त्या गोष्टीला लगाम बसणार असून, नोटीस पोहोचल्यानंतर नियमानुसार दंड भरावाच लागणार आहे.