कोल्हापूर : गेल्या वर्षी कोरोना काळात जेवढे चांगले काम झाले, तेवढे दुसऱ्या लाटेवेळी झालेले नाही. लोकांना गांभिर्य नाही. जे निर्बंध लावलेत त्याची कठोर अंमलबजावणी करा. जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाला नाही तर मग मात्र जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई अटळ असेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिला.पवार आणि आरोग्यराज्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहामध्ये कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्या बैठकीत ते बोलत होते; मात्र यावेळी पवार यांनी नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांची झडती न घेता त्यांना काही स्पष्ट सूचना केल्या.यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर, ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, राजेश पाटील, अरुण लाड, जयंत आसगावकर, राजू आवळे, आमदार, पुणे विभागाचे अति. आयुक्त डॉ. अनिल रामोड, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासनाकडून आवश्यक असणाऱ्या बाबींचा ऊहापोह करून आभार व्यक्त केले. यावेळी डॉ. एस. एस. मोरे, डॉ. अनिल माळी, डॉ. उषादेवी कुंभार, डॉ. हर्षला वेदक, डॉ. फारूक देसाई उपस्थित होते.
corona virus -निर्बंधांची कडक अंमलबजावणी न केल्यास कारवाई अटळ-अजित पवार यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 8:28 PM
CoronaVIrus In Kolhapur : गेल्या वर्षी कोरोना काळात जेवढे चांगले काम झाले, तेवढे दुसऱ्या लाटेवेळी झालेले नाही. लोकांना गांभिर्य नाही. जे निर्बंध लावलेत त्याची कठोर अंमलबजावणी करा. जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाला नाही तर मग मात्र जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई अटळ असेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिला.
ठळक मुद्देनिर्बंधांची कडक अंमलबजावणी न केल्यास कारवाई अटळअजित पवार यांचा प्रशासनाला इशारा, चाचण्या वाढवण्याच्या सूचना