शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नव्या पुरोगामी विचारांसाठी कृती गरजेची

By admin | Published: February 11, 2016 12:09 AM

जयंत पाटील : के. ब. जगदाळे जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ; विविध क्षेत्रांत कामाचा ठसा उमटविणाऱ्यांचा सत्कार

कोल्हापूर : ज्या शहराने देशाला पुरोगामी विचारांची परंपरा दिली, त्या शहरात नव्या आर्थिक, सामाजिक रचनेत राजर्षी शाहू महाराज व के. ब. जगदाळे यांच्या विचारांना कृतीची जोड देऊन नवा पुरोगामी विचार रुजविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केले. स्वातंत्र्यसैनिक व माजी नगराध्यक्ष कै. के. ब. जगदाळे (तात्या) यांचा जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ बुधवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार संपतबापू पवार पाटील, कुंडल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुण लाड, संभाजी जगदाळे, माजी आमदार सुरेश साळोखे, बाबूराव कदम, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे उपस्थित होते.या जन्मशताब्दीचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटविणारे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, पंचगंगेत बुडणाऱ्या चौदा लोकांचे प्राण वाचविणारे धाडसी रमेश गवळी, बेवारसांसाठी काम करणाऱ्या किशोर नैनवाणी, युवा कार्यकर्ता प्रसाद जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.भाई पाटील म्हणाले, महात्मा फुले, राजर्षी शाहूंनी सर्वसामान्य माणसाला जगण्याचा हक्क मिळवून दिला. देशाला पुरोगामी विचार दिला. त्याच शहरात प्रतिगामी शक्ती फोफावत आहेत. पुरोगामी विचारांची पीछेहाट होत आहे. कारण इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचत नाही. के. ब. जगदाळे यांचा इतिहास, राजकारण, त्यांनी कष्टकऱ्यांसाठी दिलेले लढे, नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हवेत, तरच परिवर्तन घडेल. पक्का विचार, पक्के आचरण आणि चांगले चारित्र्य, असे केशवरावांचे आदर्शवत व्यक्तिमत्त्व आहे.श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहता अनेक गोष्टींचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. के. ब. जगदाळेंचे विचार समाजात का रुजले नाहीत, याचाही विचार करायला हवा. सर्वसामान्यांसाठी निवडणुका लढणे सोपे राहिले नाही. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून वर्तमानकालातील निवडणुकींचे अवलोकन करणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यकाळात कारखानदारच निवडणुका लढवून विजयी होत राहतील.कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, सर्वसामान्य, गरीब कुटुंबातून आलेल्या केशवरावांनी लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला. नगराध्यक्ष असताना शहराच्या गरजा व अडचणी याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. नि:स्वार्थीपणे आपली जमीन विद्यापीठासाठी देऊन आदर्श निर्माण केला. संपतबापू पाटील म्हणाले, पुरोगामी विचार सर्वसामान्यांमध्ये रुजविण्यासाठी केशवरावांची आठवण नेहमी काढायला हवी. त्यांची समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, माणसांच्या माणुसकीशी बांधीलकी होती. समाज कसा उभारावा याची जाण त्यांना होती. आजच्या काळात केशवरावांना जाणून घेणे नव्या पिढीसाठी गरजेचे आहे. जगदाळे जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर राबविलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. अरुण लाड यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक निवास साळोखे यांनी केले. अशोक पोवार यांनी आभार मानले. अनिल घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. टोलचे संकट टळले नाहीटोलमुक्तीवर जयंत पाटील म्हणाले, ‘आयआरबी’च्या म्हैसकरांनी नुकसान भरपाईपोटी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिथून निकाल आल्यावर चारशे क ोटींच्या खर्चासाठी चौदाशे कोटी रुपये द्यावे लागतील अन् शासन हात वर करील. तेव्हा आत्ताच ठरवा, कुणाचा सत्कार करायचा अन् कुणाचा नाहीकॉँग्रेसचे रोपटे भाई जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात प्रतिगामी शक्ती वाढीस लागण्यास कॉँग्रेस जबाबदार आहे, अशी टीका केली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत ते म्हणाले, प्रतिगामी शक्तींना कॉँग्रेसने पाठीशी घातले. इतिहासात पाहिले तर हे रोपटे कॉँग्रेसने लावले व जोपासले याची साक्ष मिळेल. कॉँग्रेसचे रोपटे भाई जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात प्रतिगामी शक्ती वाढीस लागण्यास कॉँग्रेस जबाबदार आहे, अशी टीका केली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत ते म्हणाले, प्रतिगामी शक्तींना कॉँग्रेसने पाठीशी घातले. इतिहासात पाहिले तर हे रोपटे कॉँग्रेसने लावले व जोपासले याची साक्ष मिळेल.