शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

चिथावणी देणाऱ्या रिल्स करताय?, फाळकूटदादांच्या विरोधात कोल्हापूर पोलिसांचा ॲक्शन प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 1:34 PM

गुंडगिरी रोखण्यासाठी झोपडपट्ट्यांवर नजर, रिल्सची तपासणी करून कारवाई

कोल्हापूर : शहरात वाढणारी फाळकूटदादांची दहशत आणि गुंडांच्या टोळ्यांमधील संघर्ष रोखण्यासाठी पोलिसांनी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. झोपडपट्ट्यांमधील अवैध धंद्यांचे उच्चाटन करून गुंडांना मिळणारी आर्थिक रसद तोडली जाणार आहे. तसेच रिल्समधून चिथावणी देणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई होणार आहे. प्रतिबंधात्मक कारवायांसह झोपडपट्टीदादा विरोधी कायद्यानुसार कारवायांची व्याप्ती वाढविली जाणार आहे, अशी माहिती शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिली.अवघ्या विशीतील तरुणांच्या टोळ्या आणि त्यांच्या वाढत्या गुंडगिरीमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्यानंतरही त्यांचे कारनामे थांबलेले नाहीत. उलट गुन्हे दाखल झाल्याचे मिरवत ते दहशत वाढवीत आहेत. त्यामुळे गुंडगिरी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी ॲक्शन प्लॅन केला असून, तातडीने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.सराईत गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाया करून त्यांना हद्दपार, तडीपार, स्थानबद्ध करणे, एमपीडीए म्हणजेच झोपडपट्टीदादा विरोधी कायद्यानुसार गुंडांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करणे, अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे. या कारवाईतून फाळकूटदादांना गुंडगिरीला लगाम लागेल, असा विश्वास उपअधीक्षक अजित टिके यांनी व्यक्त केली.झोपडपट्ट्यांमध्ये वाढली गुन्हेगारीराजेंद्रनगर, वारे वसाहत, सुधाकर जोशी नगर, यादवनगर, सदर बाजार, ताराराणी चौक, टेंबलाई नाका, कनाननगर परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये फाळकूटदादांचे अड्डे आहेत. यात काही उपनगरे आणि आसपासच्या गावातील तरुणांचाही समावेश आहे. गरिबी, शिक्षणाचा अभाव, अवैध धंद्यांचा विळखा, कमी श्रमात पैसा मिळविण्याचा हव्यास आणि राजकीय आश्रय यातून झोपडपट्ट्यांमधील गुन्हेगारी वाढत आहे. याला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

रिल्समुळे वाढली डोकेदुखीगुंडांच्या टोळ्या रिल्समधून एकमेकांना आव्हान देतात. यातून भडका उडून खुनी हल्ले होत आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी संशयास्पद रिल्स आढळताच संबंधित तरुणांना उचलून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याचे मोबाइल आणि दुचाकी जप्त करणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुंडगिरीचे उदात्तीकरणखून झालेल्या गुंडांचे फलक शहरात ठिकठिकाणी लागतात. अनेकांच्या स्टेटसला त्याचे फोटो असतात. रिल्सद्वारे व्हिडिओ व्हायरल होतात. यातून गुंडगिरीचे उदात्तीकरण होत आहे. सुधाकर जोशी नगर येथे गुरुवारी खून झालेला गुन्हेगार सुजल कांबळे यांचे फलक वारे वसाहत परिसरात लागले आहेत. यापूर्वी राजेंद्रनगर परिसरात गुंडांचे फलक झळकले होते.

पालकांना देणार समजआक्षेपार्ह रिल्स तयार करणारे, गुन्हेगारी टोळ्यांशी लागेबांधे असलेले, गुंडांच्या समर्थनार्थ फिरणाऱ्या तरुणांना पकडून त्यांच्याकडून वर्तनात सुधारणा करण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. तसेच त्यांच्या पालकांना बोलवून समज दिली जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुन्हेगारी रोखण्यासाठी अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासह गुंडांवर कठोर कारवाया करण्याच्या सूचना शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. येत्या महिनाभरात याचे परिणाम दिसतील. - अजित टिके - शहर पोलिस उपअधीक्षक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस