एकनाथ पाटीलकोल्हापूर, दि. २ : सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याकडेला उघड्यावर शौचास बसणाºया महिला व पुरुषांवर आता पोलीस कारवाई करणार आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील १४६ पोलीस ठाण्यांना सोमवारी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.घर तिथे शौचालय हे अभियान जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषदेतर्फे जिल्ह्यात राबविले जात आहे. त्यासाठी सरकारकडून अनुदानही दिले जाते. मानवी आरोग्य चांगले रहावे, स्वच्छता राहावी यासाठी केंद्र शासन सक्रिय आहे. परंतु बहुतांशी शहरात, उपनगरासह ग्रामीण भागात अजुनही महिला, पुरुष उघड्यावर शौचास बसत असल्याच्या तक्रारी आहेत.आरोग्य विभागाकडून होणारी जुजबी कारवाईचा कोणताही असर या लोकांवर पडलेला दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याकडेला, शाळा-महाविद्यालय परिसरात पहाटे लोक शौचालयास बसलेले असतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरुन मानवी आरोग्य धोक्याचे बनत आहे.पोलिसांकडून ही कारवाई व्हावी, यासाठी मुंबई पोलिस कायदा कलम ११५/११७ नुसार कारवाई करण्याचे आदेश नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. त्यासाठी पोलिसांच्या हद्दीनुसार रोज पहाटे विशेष पथक फिरणार आहे.या पथकाच्या निदर्शनास उघड्यावर शौचालयास बसलेली व्यक्ती आढळून आल्यास तिची उचलबांगडी थेट पोलीस ठाण्यात केली जाणार आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले जाणार आहे.
उघड्यावर शौचालयास बसल्यास पोलीस करणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:55 PM
सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याकडेला उघड्यावर शौचास बसणाºया महिला व पुरुषांवर आता पोलीस कारवाई करणार आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील १४६ पोलीस ठाण्यांना सोमवारी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.
ठळक मुद्देविश्वास नांगरे-पाटील यांचे परिक्षेत्रातील १४६ पोलीस ठाण्यांना आदेशआरोग्य विभागाकडून जुजबी कारवाईमुंबई पोलिस कायदा कलम ११५/११७ नुसार कारवाई करणार