शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
3
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
4
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
5
"अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
7
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
8
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
9
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
10
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
11
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
12
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
13
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
14
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
16
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
17
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
18
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
19
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
20
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला

बाराशे वाहनचालकांवर कारवाई : शहरात ट्रॅफिक ड्राईव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 1:16 AM

कोल्हापूर : शहरातील चौकांत, नाक्यांवर व महामार्गावर सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी एक व सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत पोलीस बंदोबस्त ठेवला.

ठळक मुद्देदोन लाख ४० हजार रु. दंडाची वसुली; तीन दिवस कारवाई सत्र

कोल्हापूर : शहरातील चौकांत, नाक्यांवर व महामार्गावर सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी एक व सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत पोलीस बंदोबस्त ठेवला. यावेळी वाहनांच्या तपासणीबरोबरच चालक मद्यप्राशन करून गाडी चालवितात काय, हे तपासण्यासाठी चालकाची ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली गेली. या मोहिमेमध्ये सुमारे १२०० नियमबाह्य वाहनचालकांवर कारवाई करत २ लाख ४० हजार रुपये दंडाची वसुली केली. सोमवार ते बुधवार असे तीन दिवस हे ‘ट्रॅफिक ड्राईव्ह’ चालणार आहे.

घरफोड्या, चेन स्नॅचिंग, लूटमारीसह दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आम्ही सुरक्षित नसल्याच्या काही तोंडी तक्रारी नागरिकांनी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे केल्या. त्यांनी पुन्हा ‘ट्रॅफिक ड्राईव्ह’ घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना दिले. त्यानुसार शहरातील पाच पोलीस निरीक्षक, १०० पोलीस कर्मचाºयांची फौज सोमवारी रस्त्यावर उतरली. शिवाजी पूल, दसरा चौक, लिशा हॉटेल चौक, सदर बझार, ताराराणी पुतळा, महावीर कॉलेज चौक, मध्यवर्ती बसस्थानक, सायबर चौक, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, गंगावेश, सायबर चौक, जवाहरनगर, फुलेवाडी नाका, कळंबा नाका, वाशी नाका, आर. के. नगर आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवत प्रत्येक व्यक्तीची, वाहन, साहित्याची तपासणी केली.

वाहनांतील गॅसकिटच्या तपासणीसह परवाना, वाहनांची कागदपत्रे,तसेच ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्राद्वारे वाहनचालकांची तपासणी केली. झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, तिब्बल सीट, ‘दादा’,‘मामा’, ‘आई’, ‘पाटील’, यासह अन्य फॅशनेबल नंबरप्लेट वाहनांवर लावून वावरणाºया वाहनचालकांवर कठोर कारवाई केली. मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी पोलीस अधीक्षक मोहिते रस्त्यांवर उतरले होते. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, अशोक धुमाळ, संजय मोरे, अनिल गुजर, सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी स्वत: रस्त्यांवर उभे राहून वाहनांची तपासणी केली.सीटबेल्ट व हेल्मेटचे प्रबोधनवाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अपघातात होणाºया मृत्यूंची संख्या वाढत आहे. अनेकांना शारीरिक अपंगत्व आले आहे. अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी वेळोवेळी पोलीस दलाच्यावतीने प्रबोधन केले जात आहे. दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नसल्याने होणाºया अपघातांमध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी वाहनधारकांना सीटबेल्ट व हेल्मेट सक्तीच्या सूचना पोलिसांनी यावेळी दिल्या. 

वाहनचालकांनी वाहन चालविताना विहीत नमुन्यातील मापदंडांप्रमाणे वाहनांची नंबरप्लेट बसवावी. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू नये, सोबत योग्य ती कागदपत्रे बाळगावीत व कायदेशीर कारवाई टाळावी.- अशोक धुमाळ, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर