शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Kolhapur: जोतिबा चैत्र यात्रेत मद्यपान केल्यास कारवाई करणार, शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधीक्षकांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 4:44 PM

जोतिबा डोंगर येथे जिल्हा प्रशासन आणि सासनकाठी धारक भाविकांची बैठक संपन्न

जोतिबा : चैत्र यात्रेत मद्यपान करून सहभागी होणाऱ्या भविकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधीक्षक अप्पासाहेब पवार यांनी दिले. जोतिबा चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा डोंगर येथे सासनकाठीधारक भाविकांची शाहूवाडी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक झाली.श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील श्री जोतिबाची चैत्र पौर्णिमेची यात्रा २३ एप्रिलला होत आहे. या पार्श्वभूमीवर आज जोतिबा डोंगर येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सासनकाठीधारकांची नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मानाच्या सासनकाठ्या असणाऱ्या भाविकांना यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या. ज्यावेळी मानाच्या सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू असते त्यावेळी बिगर मानाच्या सासनकाठ्यांचा त्या मिरवणुकीत समावेश न करता त्यांना वेगळी वेळ द्यावी जेणेकरून मुख्य मिरवणुकीत गर्दी होणार नाही, अशी काही भाविकांकडून मागणी करण्यात आली. या सूचनेवर विचार करून निर्णय देण्याचे आश्वासन शिंगटे यांनी दिले.मानाच्या सासनकाठ्याना ओळखपत्र देणे, सासनकाठीधारकांना पार्किंग व्यवस्था, सासनकाठीची उंची मर्यादित ठेवणे, सासनकाट्यांचा क्रम ठरवून देणे यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग, वाहतूक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, जोतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, पोलिस उपनिरीक्षक मनोज कदम, मंडल अधिकारी वासंती पाटील, तलाठी रमेश वळिवडेकर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा