शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

प्रांताधिकारी, मंडल अधिकाऱ्यांची यड्राव फाट्यावर कारवाई

By admin | Published: January 14, 2016 12:51 AM

सव्वा लाखाचा दंड वसूल : बेकायदेशीर वाळू, दगड वाहतूक, ट्रक, डंपरचा पाठलाग करून घेतले ताब्यात

इचलकरंजी : वाळू आणि दगडांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या पाच डंपर व तीन ट्रकवर बुधवारी यड्राव फाटा येथे कारवाई करीत सव्वा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाई सुरू असताना एका चालकाने डंपरसह पलायन करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई मंडल अधिकारी बी. डी. कोळी व त्यांच्या पथकाने केली. हातकणंगले व शिरोळ तालुक्यांत मोठ्या प्रमाणात वाळू आणि दगडांची तस्करी व बेकायदेशीर वाहतूक होत असल्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. सातत्याने कारवाईचा बडगा उगारूनही याला आळा घालण्यात प्रशासनाला यश येत नाही. नजीकच्या कर्नाटक व शिरोळ तालुक्यांतील वाळूचे ट्रक नदीवेस मार्गे मोठ्या प्रमाणात शहरात येत होते. याठिकाणी अनेकवेळा कारवाई झाल्याने बेकायदा वाहतूक करणाऱ्यांनी आता नवा मार्ग शोधला आहे. शिरोळ तालुक्यातील जांभळी-नांदणी-यड्रावमार्गे शहापुरातून ही वाहतूक केली जात आहे. याचा सुगावा लागल्याने प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठ्यांना सूचना देऊन कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी पहाटेपासूनच शहापूर रस्त्यावर सापळा लावण्यात आला होता. पहाटे पाच वाजल्यांपासून शहापुरात येणारे ट्रक व डंपर यड्राव फाटा येथे अडविण्यात आले. यावेळी चालक आणि शासकीय अधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झडला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश पवार व त्यांचे सहकारी घटनास्थळी आल्यानंतर पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी (एमएच ०९ बीसी २९५७) संतोष भोसले यांच्या डंपरवर, (एमएच ०९ सीयू २६५०) विजय नलवडे, (एमएच ०९ जे ५०६१) विजय नलवडे, (एमएच ०९ एल ४९६७) गंगाराम शिंगाडे व (एमएच ०९ बीसी १३८) मेहबूब नदाप या पाच डंपरवर, तर (एमएच ०९ झेड ८२३) रमेश कलगुटगी, (एमएच ०९ झेड १९४) रफिक नदाफ व (एमएच ०९ सीए १४३०) पापा राठोड या तीन ट्रकवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई मंडल अधिकारी बी. डी. कोळी, तलाठी महेश साळवी, मच्छिंद्र कुंभार, सुरेश भानुसे, पी. टी. धोंड, कोतवाल एस. एस. कोळी, नेताजी पाटील यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)  

४ही कारवाई सुरू असतानाच (एमएच ०९ बीसी २९५७) या डंपरचा चालक संतोष भोसले याने नकळतपणे डंपर सुरू करून घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बाब लक्षात येताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करत थोड्याच अंतरावर त्याला पकडले. ४डंपरचालकांकडून प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे ५० हजार आणि ट्रकचालकांकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे ७५ हजार असा सव्वा लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.