या प्रकरणाची तक्रार २१ जानेवारीला तक्रारदाराने दिली होती. त्यानंतर १ फेब्रुवारी २०२१ ला शासकीय पंचांसमक्ष पडताळणी केली. त्यातही संशयित माने याने लाचेची मागणी केली. मोठी रक्कम तक्रारदाराला जमविण्यास वेळ लागल्याने ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. यात एकूण १५ दिवसांचा कालावधी गेला. मात्र, या कानाची खबर त्या कानालाही लागली नाही.
तिसरी कारवाई
या विभागाने मागील वर्षी एकूण २७ प्रकरणात लाचखोरांना पकडले. त्यानंतर गेल्या ३६ दिवसांत ही तिसरी कारवाई आहे. यात सर्वाधिक २० लाख रुपयांची रोख स्वरूपातील लाच घेताना पकडण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार आहे.
नोटा अशा...
तक्रारदाराने लाच देण्यासाठी १९ लाख रुपये ५०० रुपयांच्या स्वरूपात म्हणजेच ३९०० नोटा, तर एक लाख २००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ५० नोटांचे बंडल असे एका साध्या पिशवीत भरून आणले होते.