मागील पाच वर्षांत संघाच्या सभेला तत्कालीन सत्तारूढ गटाचे नेते उपस्थित राहात होते. सत्तांतरानंतरही ही परंपरा कायम राहिल्याची चर्चा सभास्थळी होती.
घाणेकर यांचा सपत्नीक सत्कार
संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर हे १४ ऑक्टोबरला कार्यमुक्त होत असल्याने त्यांचा सपत्नीक सत्कार मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
मुश्रीफ, सतेज पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव
वाशी व भोकरपाडा येथील शासनाची जागा संघाला अल्प दरात घेऊन देण्यात मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील यांच्यास अध्यक्ष विश्वास पाटील व संचालकांनी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव अनिल सोलापुरे यांनी मांडला.
डिबेंचर्सची मुदत दहा वर्षे करा
दूध संस्थांकडून डिबेंचर्सच्या रूपाने जमा होणाऱ्या रकमेवर ११ टक्के व्याज परतावा देतो. सात वर्षांनंतर ही रक्कम शेअर्सकडे वर्ग केली जाते. त्याऐवजी दहा वर्षे केली, तर हा निधी विकासासाठी वापरता येईल, अशी सूचना अरुण डोंगळे यांनी केली.
सभासद सहभागी झाले पाहिजेत- मुश्रीफ
ऑनलाईन सहभागी होण्यासाठी सुमारे ४ हजार संस्था प्रतिनिधींना लिंक दिली होती. मात्र सभेला सहभागी होत एकानेही प्रश्न उपस्थित केला नाही. उपस्थितांपैकी दत्ता पाटील-केनवडे यांनीच एक प्रश्न उपस्थित केल्याने अवघ्या ४० मिनिटांत सभा संपली. यावर ऑनलाईन का असेना मात्र सभासद सहभागी झाले पाहिजेत, तसे दिसले नाही. जिल्हा बँकेला व्यवस्थित करू, असे मंत्री मुश्रीफ यांनी सभेनंतर सांगितले.
अशी असेल दुभत्या जनावरांची विमा योजना
कोणत्याही आजाराने दगावल्यास एक लाख रुपये
पहिल्या वेतनानंतर गाभण जात नसेल, तर भाकड म्हणून ५० हजार मिळणार.
जनावर व्याल्यानंतर दुधाच्या कासेचे चारही स्तन निकामी झाल्यास ५० हजार मिळणार
फोटो ओळी :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ५९ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अजित नरके, बाबासाहेब चौगले, मंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, अरुण डोंगळे, शशिकांत पाटील-चुयेकर, अभिजित तायशेटे आदी उपस्थित हाेते. (फाेटो-२४०९२०२१-कोल-गोकुळ) (छाया- आदित्य वेल्हाळ)