गुरुवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली असली तरी मध्यरात्री गगनबावड्यात अतिवृष्टी झाली. तब्बल १३२ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. त्याखालोखाल राधानगरी ५५, चंदगड ३०, भूदरगड २८, शाहूवाडी २२, आजरा २१, कागल १८, पन्हाळा १६, गडहिंग्लज १५, करवीर १४, हातकणंगले ६, शिरोळ ५ असा सरासरी ३० मिलिमीटर पाऊस झाला आहे.
कोल्हापूर गारगोटी, चंदगड सुरू
कोल्हापूर ते रत्नागिरी मलकापूर मार्ग बंद असला तरी वडगाव वाठारमार्गे या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर ते गारगोटी उत्तूर फाटामार्गे गडहिंग्लज, आजरा चंदगड मार्ग सुरू झाला आहे. कोल्हापूर ते कागल, गांधीनगर मार्ग सुरू आहे, पण कोल्हापूर ते इचलकरंजी, शिरोळ रस्ता बंद आहे. कोल्हापूर ते राधानगरी मुदाळतिट्टा घोटवडेमार्गे सुरू आहे. कोल्हापूर ते गगनबावडा दोनवडे येथे बंद असून कोल्हापूर ते पन्हाळा, शाहूवाडी आंबा हा मार्ग अद्याप बंदच आहे. कोल्हापूर ते सिंधुदुर्ग मार्ग बंद आहे; पण फाेंडा व आंबोली घाटमार्गे सुरू आहे. कोल्हापूर ते सांगली मार्ग बंदच आहे.