जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील १२, पन्हाळ्यातील २३, करवीरमधील आंबेवाडी, गगनबावड्यातील टेकवाडी, राधानगरीतील ९, हातकणंगलेतील निल्लेवाडी, आजऱ्यातील ४, भुदरगडमधील मडिलगे बुद्रुक, गडहिंग्लजमधील जरळी, चंदगडमधील कोनेवाडी, पिळणी या गावांचा संपर्क तुटला आहे.
--
पुरामुळे बंद झालेले रस्ते...
सांगली - कोल्हापूर बायपास रस्ता वाहतुकीसाठी बंद
- पन्हाळा रस्ता खचून वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद
- गारगोटी-गडहिंग्लज मार्गावरील पालघाट येथे दरडी कोसळल्याने व पाण्यामुळे वाहतूक बंद
- गारगोटी - कोल्हापूर, गारगोटी-गडहिंग्लज, गारगोटी - कडगाव मार्ग बंद. त्यामुळे गारगोटीचा संपर्क तुटला आहे.
- पुणे- बंगलोर हायवेलगतचा गली फाटा ते कोल्हापूर सर्व्हिस रोड व बंगलोर पुणेकडून शिरोलीला जाणारा रस्ता बंद
- सांगली फाटा ते सांगली रस्ता बंद
- हनुमान नगर शिये -कसबा बावडा रोड बंद
- शिये-भुये, निगवे मार्ग बंद
----