कोल्हापूर : नेकलेस पॉपलर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विदेशी वृक्षाची ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या प्रयत्नांमुळे नव्याने नोंद झाली असून कोल्हापूरच्या वृक्षसंपदेत आणखीन भर पडली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची वृक्षसंपदा अत्यंत समृद्ध आहे. जिल्ह्यात एकूण ३२५ जातींचे वृक्ष आढळले आहेत. यातील १४० प्रकारच्या देशी विदेशी वृक्षांची नोंद एकट्या शहरात आहे. यामध्ये आता नेकलेस पॉपलर या नव्या वृक्षाची नोंद झाली आहे.
गेल्या आठवड्यात कोल्हापुरातील वृक्षप्रेमी परितोष उरकुडे यांनी टाकाळा रोड, राजारामपुरी येथील भारत हौसिंग सोसायटीशेजारी असणाऱ्या एका घराच्या बागेत या अनोळखी वृक्षाचे फोटो पाठवून मधुकर बाचुळकर यांच्याकडे माहिती विचारली होती. असे वृक्ष डॉ. बाचुळकर यांनी भूतान देशात पाहिले होते, पण कोल्हापूर शहरात हा वृक्ष प्रथमच दिसल्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यांनी खात्री केली असता याची ओळख पटली.
जगात आढळतात १८ प्रजाती
पॉपलर या गटातील वृक्ष शीत कटिबंध प्रदेशात, उत्तर अमेरिका खंडातील कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिको येथील जंगलात, विशेषत: नदीकाठावर आढळतात. नेकलेस पाॅपलर हे यापैकी एक असून पॉप्युलस डेल्टॉयडस असे त्याचे शास्त्रीय नाव आहे. या जातीमध्ये जगभरात १८ प्रजाती आहेत. जलद वाढणारा हा वृक्ष सॅलिकेएसी या कुळातील असून हा वृक्ष एका हंगामात ४० दशलक्ष बिया तयार करतो. आपल्या भागातही नदीकाठी वाढणारे वाळूंज (बच्च्याचे झाड) हे वृक्षही याच कुळातील आहेत. याची उंची व ६५ ते १९५ फुटापर्यंत वाढते तर खोडाचा घेर नउ फुटांपेक्षाही जास्त असतो. साल गडद करड्या रंगाची असून ती भेगाळलेली असते. पाने साधी, एकाआड एक, ४.० ते १० सेें.मी. लांब, ४.० ते ११.० सें.मी. रुंद व त्रिकोणी आकारची असतात. देठ ३ ते १२ सेंमी लांब, चपटा आणि तळाशी फुगीर असतो.
कोट
राज्यातील कृषी विद्यापीठांनी आणि कृषी महाविद्यालयांनी या वृक्षांच्या लागवडीबाबत पूर्वी प्रयत्न केल्याचे संदर्भ आहेत, पण वनस्पतीकोशात या वृक्षाची रितसर नोंद आढळत नाही. कोल्हापूर जिल्हा व शहरात एकमेव असणारा हा नेकलेस पॉपलर वृक्ष महापालिका प्रशासनाने हेरिटेज वृक्ष म्हणून जतन करणे आवश्यक आहे.
- डॉ. मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ.
--------------------------
फोटो : 23082021-Kol-necklace poplar01
फोटो ओळी : कोल्हापुरातील टाकाळा रोड, राजारामपुरी येथील भारत हौसिंग सोसायटीशेजारी असणाऱ्या एका घराच्या बागेत आढळणारा नेकलेस पॉपलर वृक्ष.
फोटो : 23082021-Kol-necklace poplar01
फोटो ओळी : कोल्हापुरातील टाकाळा रोड, राजारामपुरी येथील भारत हौसिंग सोसायटीशेजारी असणाऱ्या एका घराच्या बागेत आढळणारा नेकलेस पॉपलर वृक्ष.
फोटो : 23082021-Kol-necklace poplar2new
फोटो ओळी : कोल्हापुरात आढळणाऱ्या नेकलेस पॉपलर वृक्षाची फळे.
फोटो : 23082021-Kol-necklace poplar03
फोटो ओळी : कोल्हापुरात आढळणाऱ्या नेकलेस पॉपलर वृक्षाची उलगडलेली फळे.
230821\23kol_8_23082021_5.jpg~230821\23kol_11_23082021_5.jpg
फोटो : 23082021-Kol-necklace poplar01फोटो ओळी : कोल्हापूरातील टाकाळा रोड, राजारामपुरी येथील भारत हौसिंग सोसायटीशेजारी असणाऱ्या एका घराच्या बागेत आढळणारा नेकलेस पॉपलर वृक्ष. ~फोटो : 23082021-Kol-necklace poplar03फोटो ओळी : कोल्हापूरात आढळणाऱ्या नेकलेस पॉपलर वृक्षाची उलगडलेली फळे.