शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

खाद्यतेलाचा अतिरिक्त साठा जप्त

By admin | Published: October 24, 2015 12:10 AM

जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई : कागलच्या बरकत नायकवडी यांच्यावर गुन्हा दाखल

कागल/कोल्हापूर : खाद्यतेलाचा मर्यादेपेक्षा अतिरिक्त साठा केल्याप्रकरणी कागल येथील बरकत नायकवडी यांच्यावर गुरुवारी (दि. २२) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पुरवठा विभागाने छापा टाकून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त केले. इचलकरंजी येथे तपासणीवेळी परवाना न दाखविलेल्या डाळ आणि खाद्यतेलाची चार दुकाने सील करण्यात आली. शुक्रवारी पुरवठा विभागाकडून शहरात विविध ठिकाणी छापे टाकून दुकाने व गोदामांची तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दिवाळीपर्यंत ही धडक कारवाई सुरू राहणार आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.खाद्यतेल, डाळ आणि खाद्यतेल बियांचा मर्यादेपेक्षा अतिरिक्त साठा केला असल्याच्या संशयावरून जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील परवानाधारकांची दुकाने, गोदामांवर बुधवार (दि. २१)पासून छापे टाकून धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. यामध्ये आतापर्यंत अदानी विल्मर लिमिटेड व गोल्डन व्हॅली अ‍ॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या उजळाईवाडी (ता. करवीर) येथील भाडेतत्त्वावरील गोदामात एकत्रित सुमारे ९५ लाख रुपयांच्या खाद्यतेलाचा अतिरिक्त साठा सापडला. पुरवठा कार्यालयाने जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी या खाद्यतेलाचा साठा ताब्यात घेतला. याबाबत या कंपन्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुरवठा विभागाने गुरुवारी कागल येथे धडक कारवाई केली. यामध्ये किरकोळ खाद्यतेल परवानाधारक बरकत नायकवडी यांच्याकडे मर्यादेपेक्षा म्हणजे २० क्विंटलपेक्षा अधिक २८.६१ क्विंटल इतका साठा आढळल्याने तो ताब्यात घेण्यात आला. याबाबत त्यांच्याविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत क-७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी प्रांत मोनिका सिंह, तहसीलदार शांताराम सांगडे उपस्थित होते. इचलकरंजी येथे तपासणीवेळी परवाना उपलब्ध करून न दिल्याबद्दल खाद्यतेलाची दोन व डाळीची दोन दुकाने सील केली. जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. शुक्रवारीही रात्री उशिरापर्यंत शाहू मार्केट यार्डसह शहराच्या विविध भागांतील दुकाने व गोदामांची तपासणी सुरू होती. (प्रतिनिधी)