शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राजाराम कारखान्यासाठी हातकणंगले तालुक्यात जोडण्या, गट दोनकडे विशेष लक्ष; पाटील-महाडिक यांचा प्रचाराचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 6:17 PM

निर्णायक मतांचा गठ्ठा असल्याने येथे चुरशीच्या जोडण्या सुरू

आयुब मुल्लाखोची : राजाराम साखर कारखान्याच्या प्रचाराची खडाखडी हातकणंगले तालुक्यात जोमाने सुरू झाली आहे. थेट सभासद भेटीला महत्व देऊन नेते मंडळी गावागावात पोहचली आहेत. विरोधी गटाचे नेते आमदार सतेज पाटील व सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार अमल महाडिक यांनी पहिल्या टप्प्यात हातकणंगले तालुक्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. सभासद बैठका, संवाद भेट यातून दोन्ही बाजूकडून भूमिका मांडली जात आहे. निर्णायक मतांचा गठ्ठा असल्याने येथे चुरशीच्या जोडण्या सुरू झाल्या आहेत.हातकणंगले तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे ५४१२ इतके मतदान आहे. गत वेळेच्या निवडणुकीत महाडिक गटाला हातकणंगले तालुक्याने साथ दिल्याने सत्ताधारी गटाचा विजय सोपा झाला. तर सतेज पाटील गटाला इतर ठिकाणी चांगली साथ मिळाली होती. व हातकणंगले तालुक्यात शंभरच्या आसपास कमी मतदान झाले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी हाच तालुका पुन्हा लक्षवेधी बनला आहे.गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते हातकणंगले तालुक्यात दररोज संपर्कात आहेत. कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी सतेज पाटील गटात प्रवेश केल्याने सतेज पाटील गटाला चांगलेच बळ मिळाले आहे. तर नव्या राजकीय मांडणी नुसार कोरे, आवाडे, माने गट यांची रसद महाडिक गटाला मिळणार आहे. आमदार राजू आवळे, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट सतेज पाटील गटाबरोबर राहणार आहे.सध्या बाकीचे नेते त्यांचे कार्यकर्ते उघड प्रचारात नसले तरी पाटील-महाडिक यांचे कार्यकर्ते मात्र जोरकसपणे प्रचारात सक्रिय झाले आहेत. सभासदांच्या सुख दुःखाच्या कार्यक्रमात हजेरी लावत आहेत. गेल्या दोन दिवसात सतेज पाटील यांनी तासगाव, मौजे वडगाव, मिणचे, सावर्डे येथे बैठका घेतल्या. तर अमल महाडिक यांनी लाटवडे येथून बैठका, भेटीगाठी घेत प्रचार सुरू केला. भेंडवडे,खोची,हालोंडी येथे सभासदांच्या भेटी घेतल्या. या दोन्ही नेत्यांनी आरोप प्रत्यारोप करीत निवडणुकीत चांगलीच रंगत ईर्षा निर्माण होण्याची संकेत दिले आहेत.महाडिक गटाने संस्था गटातील सभासदांच्या भेटीसाठी स्वतंत्र टीम केली आहे. यामध्ये वडगाव बाजार समितीच्या संचालकांचा समावेश आहे. कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील, माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील, सुरेश पाटील, बाळकृष्ण बोराडे, अमरसिंह पाटील, श्रीकांत पाटील, संभाजी महाडिक हातकणंगले तालुक्यातील महाडिक गटाचे कार्यकर्ते प्रचारात आहेत. तर सतेज पाटील गटाकडून कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, उत्तम सावंत, महेश चव्हाण आदी सक्रिय सहभागी असतात.गट दोनकडे विशेष लक्षनागावपासून कुंभोज परिसरापर्यंत गट क्रमांक दोन आहे. या गटामध्ये अमल महाडिक यांची उमेदवारी असते. यामुळे सत्ताधारी गटाने आपले लक्ष येथे अधिक केंद्रित केले आहे. तर याच गटात विरोधी गटातून माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी उमेदवारी असणार आहे. सतेज पाटील यांनी सर्वात जास्त संपर्क व प्रचाराचे प्रभावी नियोजन याठिकाणी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकAmal Mahadikअमल महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील