कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या १०३७ कोरोनाचे रुग्ण ऑक्सिजनवर असून जिल्ह्यात आणखी अडीच हजार रुग्णांना पुरेल इतका ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी मंगळवारी जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन आढावा घेतला.
जिल्ह्यातील सीपीआर, इंदिरा गांधी रुग्णालय इचलकरंजी, संजय घोडावत विद्यापीठ, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, शेंडा पार्क या ठिकाणी ऑक्सिजन तयार करण्याची सुविधा गेल्यावर्षीच निर्माण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये १०३७ कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. बुधवारसाठी ३७ टन ऑक्सिजनची मागणी आहे. मंगळवारी २७ टन ऑक्सिजन शिल्लक आहे. तेवढेच ऑक्सिजन दुसऱ्या दिवशीही मागणी केल्यास उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनची टंचाई नसल्याचे सांगण्यात आले.
ऑक्सिजनवरील रुग्ण : १०३७
मागणी : ३२ टन
साठ्यातील शिल्लक : २७ टन
मागणी केल्यास : ३२ टन उपलब्ध