इचलकरंजी : लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असतानाही येथील श्री आदिनाथ बॅँकेला या आर्थिक वर्षात दोन कोटी ३० लाख रुपये इतका ढोबळ नफा, तर ९६ लाख नफा झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष सुभाष काडाप्पा यांनी बॅँकेच्या बैठकीत दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील मुख्य व्यवसाय असलेला वस्त्रोद्योग अस्थिर बनला. त्यामुळे बॅंकिंग व्यवसाय करणे आव्हानात्मक बनले. त्यातूनही आर्थिक वर्षात बँकेकडे १३० कोटी ९ लाख रुपयांच्या ठेवी व ७९ कोटी ५३ लाख कर्जे आहेत. बॅंकेचा ढोबळ एनपीए ५.११ टक्के असून, नेट एनपीए शून्य टक्के ठेवण्यात यश मिळाले आहे.
बॅँकेच्या सांगली नाका व माणगाव येथील शाखांमध्ये एटीएम सुविधा कार्यरत करण्यात आली आहे. तसेच बॅंकेची वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. बॅंकेच्या या वाटचालीत सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार यांनी बहुमोल सहकार्य केले आहे. तसेच माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व संचालकांनी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेत बॅंकेच्या प्रगतीसाठी काम केले. त्यामुळेच बॅंकेने यश संपादन केल्याचे काडाप्पा यांनी नमूद केले.
यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेब केटकाळे, कुंतीलाल पाटणी, बाळासाहेब चौगुले, पारिसा बडबडे, रवींद्र देवमोरे, बापूसाहेब जमदाडे, चंद्रकांत मगदूम, अभयकुमार मगदूम, गुरुनाथ हेरवाडे, शंकर हजारे, सूचित हेरवाडे, जिनेंद्र खोत, संपत कांबळे, मंगल देवमोरे, पद्मावती लडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी जे. बी. चौगुले उपस्थित होते.
फोटो ओळी
०१०४२०२१-आयसीएच-०५ - सुभाष काडाप्पा
०१०४२०२१-आयसीएच-०६ -बाळासाहेब केटकाळे