कोल्हापुर: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. मतदान निर्भयपणे होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिली.पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कामकाजाबाबतचा आढावा जिल्हाधिकारी देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याशी संवाद साधून घेतला. जिल्ह्यातील २८१ केंद्रांवर मतदान होणार आहे. याबाबतची पूर्वतयारी पूर्णत्वास आली आहे.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. ते सोमवारी (दि. ३० नोव्हेंबर) आपापल्या मतदान केंद्रावर जातील. त्या दिवशी पुन्हा त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. मतदान निर्भय आणि मुक्तपणे होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षिततेसाठी पोलीस दल नियुक्त आहे. मतदान केंद्राच्या बाहेरही पोलीस यंत्रणा आणि गृहरक्षक दल यांची नियुक्ती केली आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन तयार असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, ह्यरोहयोह्णच्या उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, तहसीलदार अर्चना शेटे उपस्थित होते.जिल्हाधिकारी देसाई यांनी केलेल्या सूचना
- जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे आदर्श करा.
- मतदान केंद्रावर पाणी, स्वच्छतागृहे, मदत कक्ष, आवश्यक फर्निचर, पल्स ऑक्सिमीटर यांची सुविधा करा.
- कोविडच्या अनुषंगाने सामाजिक अंतर, सॅनेटायझरचा वापर,
- थर्मल गनचा वापर, विनामास्क मतदारांना देण्याबाबत खबरदारी घ्यावी
- मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
कोल्हापुरात गुरुवारी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संवाद साधून घेतला.