कोल्हापूर : शहरातील सतत गर्दीचे असलेले महाद्वार व ताराबाई रोड हे रस्ते अतिक्रमणमुक्त केल्याबद्दल शिवाजी पेठेतील खंडोबा तालमीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचा बुधवारी सत्कार केला व त्यांचे आभार मानले.
खंडोबा तालीम मंडळाच्या वतीने शिष्टमंडळ प्रशासक बलकवडे यांना भेटले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विश्वास पोवार, अजित हारूगले, परिवहन सभापतीचे माजी सभापती चंद्रकांत सूर्यवंशी, महेश निकम, बबनराव मोरे, ललित सरनाईक, शेखर पोवार, बाबूराव घाटगे, भीमराव बोडके, संजय चौगुले, संजय निकम, अमर जाधव व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत कार्यकर्त्यांनी शहरातील अन्य रस्त्यांवरीलही अतिक्रमणे हटवून सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे असे आवाहन केले. अतिक्रमण हटविले की काही महिन्यांनी पुन्हा फेरीवाले, विक्रेते तेथे अतिक्रमण करतात. वारंवार सांगूनही जर कोणी ऐकत नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे सुचवितानाच चांगल्या कामात खंडोबा तालमीचे नेहमी सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
फोटो क्रमांक - १७०२२०२१-कोल-खंडोबा तालीम
ओळ - कोल्हापुरातील महाद्वार व ताराबाई रोड अतिक्रमणमुक्त केल्याबद्दल शिवाजी पेठेतील खंडोबा तालमीतर्फे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचा सत्कार करण्यात आला.