शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

शासन आदेश मोडणाºया ‘गोकुळ’वर प्रशासक नेमा: सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 7:10 PM

कोल्हापूर : विविध कारणांनी अडचणीत आलेल्या दूध व्यवसायाला सावरण्यासाठी राज्य सरकारने जून २०१७ मध्ये म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याचे आदेश राज्यातील दूध संघांना दिले; पण ‘गोकुळ’ने गाय दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करून शासन आदेशाला ‘केराची टोपली’ दाखविल्याने त्यांच्यावर सहकार कलम ७८ (अ) नुसार प्रशासक नेमावा, ...

ठळक मुद्देदुग्ध विभागाकडे मागणी हिंमत असेल तर जानकर यांनी कारवाई करावी

कोल्हापूर : विविध कारणांनी अडचणीत आलेल्या दूध व्यवसायाला सावरण्यासाठी राज्य सरकारने जून २०१७ मध्ये म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याचे आदेश राज्यातील दूध संघांना दिले; पण ‘गोकुळ’ने गाय दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करून शासन आदेशाला ‘केराची टोपली’ दाखविल्याने त्यांच्यावर सहकार कलम ७८ (अ) नुसार प्रशासक नेमावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी सहायक निबंधक(दुग्ध) अरुण चौगले यांच्याकडे केली.

आमदार पाटील म्हणाले, सर्वसाधारण सभा कशी झाली हे उत्पादकांना माहिती आहे. प्रोसेडिंगबरोबर प्रसारमाध्यमांतील वृत्तांचा उल्लेख अहवालात करणे अपेक्षित होते. याबाबत आम्ही न्यायालयात जाणार आहोतच पण शासनाने आदेश देऊनही गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात ‘गोकुळ’ ने केली आहे. यावर तरी आपल्याकडून उचित कार्यवाही व्हावी. ज्या संस्थांना सरकारकडून वित्तीय सहाय्य मिळते, त्यांना शासननिर्णय बंधनकारक असतो. दि. १९ जूनला दूध दरवाढीबाबत काढलेल्या शासननिर्णयाला ‘गोकुळ’ संचालकांनी केराची टोपली दाखवली आहे. अगोदरच महागाईने मेटाकुटीला आलेला उत्पादक दरकपातीने हैराण झाला असून सहकार कलम ७८ (अ) नुसार प्रशासक नियुक्तीची कारवाई करावी. अशी मागणी त्यांनी केली.

दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा दरवाढीचा अध्यादेश प्रसिद्धीसाठी होता का? उत्पादकांबरोबर सरकारच्या डोळ्यांत धूळफेक करणाºया ‘गोकुळ’वर हिंमत असेल तर त्यांनी कारवाई करावी, असेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान, दरकपातीबाबत ‘गोकुळ’कडून खुलासा मागितल्याचे अरुण चौगले यांनी सांगितले. ऋतुराज पाटील, सदाशिव चरापले, बाळ कुपेकर, विजयसिंह मोरे, किरणसिंह पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत खोत, किशोर पाटील, प्रदीप झांबरे, निवास पाटील, विलास साठे, दशरथ माने, राऊ पाटील, मोहन सालपे, बाबासाहेब देवकर, विश्वास नेजदार, अंजना रेडेकर आदी उपस्थित होते.‘सोलापूर’ संघाच्या संचालकांना नोटिसाशासन आदेश होऊन दूध दरवाढ न केल्याबद्दल विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकांना नोटिसा बजावल्या आहेत. पंधरा दिवसांच्या आत खुलासा सादर न केल्यास अथवा असमाधानकारक खुलासा असल्यास ‘कलम ७८’ (अ) नुसार कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.-उचलीबाबत पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करावीउसाच्या पहिल्या उचलीबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यस्थी करून तोडगा काढावा व हंगाम लवकर सुरू करावा, असे पाटील यांनी सांगितले.