शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

महागावच्या राजा शिवछत्रपती महाविद्यालयावर प्रशासक

By admin | Published: August 11, 2016 12:20 AM

अजय साळी यांची नियुक्ती : उच्चशिक्षण सहसंचालकांचा आदेश

कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांची महागाव (ता. गडहिंग्लज) येथील राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रशासकपदी शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी समितीने दिलेल्या अहवालाची दखल घेऊन उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. धनराज माने यांनी संबंधित महाविद्यालयावरील प्रशासकपदाचा आदेश दिला. या आदेशानुसार डॉ. साळी यांनी प्रशासकपदाचा कार्यभार सोमवारी (दि. ८) स्वीकारला आहे.या प्रशासकपदाच्या नियुक्तीबाबत डॉ. साळी यांनी सांगितले की, संबंधित महाविद्यालय सेनापती प्रतापराव गुजर शिक्षण संस्थेतर्फे संचलित आहे. महाविद्यालयाच्या कारभाराबाबत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यात विद्यार्थ्यांच्या शुल्काच्या पावत्यांमधील घोळ, सन १९९५-९६ पासून महाविद्यालयाला अनुदान मिळत असूनही पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव, प्राध्यापकांच्या वेतनामधील काही रकमा राखून ठेवणे, आदींचा समावेश होता. या विविध तक्रारी शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. त्यावर विद्यापीठाने चौकशी समितीची नियुक्ती केली. या समितीचा अहवाल सहसंचालकांचा अभिप्राय घेऊन शासनाला सादर करण्यात आला. हा अहवाल सादर करण्यापूर्वी महाविद्यालयाला त्यांच्या त्रुटी, चुकांची दुरुस्ती करण्यासाठी वेळ देण्यात आला होता; पण याबाबत काहीच सकारात्मक कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संबंधित अहवालाची दखल घेऊन शासनाने महाविद्यालयावर प्रशासक म्हणून माझी नियुक्ती केली. याबाबतचे उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. माने यांनी ४ आॅगस्टला पत्र पाठविले. या पत्राद्वारे त्यांच्या आदेशानुसार सोमवारी प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. दरम्यान, याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निवास जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाने महाविद्यालयावर प्रशासक नेमल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)‘नॅक’ मूल्यांकनाला प्राधान्यमहाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन करून घेण्याला माझे प्राधान्य राहील, असे डॉ. साळी यांनी सांगितले. ते म्हणाले, तीन वर्षांसाठी प्रशासक म्हणून शासनाने माझी नियुक्ती केली आहे. महाविद्यालयातील अडचणी सोडविण्यासह विकास साधण्यासाठी पहिल्यांदा महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करणार आहे.